Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल, मिळणार एवढे पैसे

Indian Team T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Team T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या मेलबर्नच्या मैदानावर उद्या (13 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. जिथे नशिबाने साथ देत पाकिस्तानी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी इंग्लंडने उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव करत अंतिम फेरीचा मार्ग मोकळा केला. उपांत्य फेरीत पराभूत होऊनही भारतीय खेळाडूंना मोठी रक्कम मिळणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...

भारतीय संघाला मिळणार एवढे पैसे

टीम इंडियाला (Team India) सेमीफायनल मॅचमध्ये इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता, पण सेमीफायनल मॅच हरणाऱ्या टीमला ICC कडून US $ 4 मिलियन (सुमारे 3 कोटी) दिले जाईल. त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. भारतासोबत न्यूझीलंडलाही ही रक्कम मिळणार आहे, कारण सेमीफायनलमध्ये किवी संघाला पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.

विजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडणार

T20 विश्वचषक 2022 ची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला US$ 1.6 दशलक्ष म्हणजे सुमारे 13 कोटी 4 लाख भारतीय रुपये बक्षीस दिले जाईल. त्याच वेळी, अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला $800,000 (सुमारे 6 कोटी रुपये) मिळतील.

टीम इंडियाचा लाजिरवाणा निरोप

T20 विश्वचषक 2022 मध्ये 16 संघ सहभागी झाले होते. या T20 विश्वचषकात अनेक छोट्या संघांनी चांगली कामगिरी केली. नेदरलँड्सने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव करुन टी-20 विश्वचषकाची दिशा बदलली. भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली, परंतु उपांत्य फेरीत संघ इंग्लंडसमोर टिकू शकला नाही आणि 10 विकेट्सने सामना गमावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT