T20 World Cup: 'Bye Bye India...', भारताच्या पराभवावर पाकिस्तानची मिस्ट्री गर्ल म्हणाली

Indian Cricket Team: टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.
Mystery Girl
Mystery GirlDainik Gomantak

Pakistan Mystery Girl Reaction: T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर भारतीय चाहते निराश झाले आहेत. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. भारतीय संघाने 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही.

पाकिस्तानच्या मिस्ट्री गर्लने प्रतिक्रिया दिली

भारतीय संघाच्या पराभवावर पाकिस्तानची 'मिस्ट्री गर्ल' नताशाने प्रतिक्रिया दिली आहे. काल (बुधवार) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर नताशा चर्चेत आली होती. ती सिडनीमध्ये पाकिस्तान संघाला चिअर करताना दिसली होती. सामन्यात अनेकदा कॅमेरामनचे लक्ष नताशाकडे गेले. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) ती प्रचंड फेमस झाली. नताशा ऑस्ट्रेलियात राहते. ती मूळची पाकिस्तानी असून मेलबर्नमध्ये राहते.

Mystery Girl
T20 World Cup: आज टिम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान; पाहा कधी, कुठं होणार सामना

तसेच, नताशाने सामन्यानंतरच्या मुलाखतीत सांगितले की, 'नसीम शाह माझा आवडता गोलंदाज आहे. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) संघ ज्या प्रकारे खेळला त्यामुळे ती खूप खूश आहे.' नताशाने आता टीम इंडियाच्या पराभवावर ट्विट केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बाय बाय इंडिया.'

Mystery Girl
IND vs ENG T20 World Cup: टीम इंडियाला 'या' 5 कारणांमुळे मिळू शकते तिकीट टू फिनाले...

इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत दहा गडी राखून झालेल्या पराभवाने भारतीय संघाचे 11 वर्षांनंतर आयसीसी विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. जगभरातील कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली. अॅलेक्स हेल्स आणि कर्णधार जोस बटलर यांची नाबाद अर्धशतके आणि पहिल्या विकेटसाठी 170 धावांची विक्रमी भागीदारी यामुळे इंग्लंडने भारताचा दहा गडी राखून पराभव केला. आता या विजयानंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडने प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com