Team India Instagtram
क्रीडा

SA vs IND: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना! कुठे अन् कधी होणार मॅच, जाणून घ्या एका क्लिकवर

Pranali Kodre

Team India South Africa Tour 2023-24:

भारतीय क्रिकेट संघ वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर देखील व्यस्त दिसून येत आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका संपली. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सामन्यांना 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

याशिवाय भारतीय अ संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून त्यांना 3 प्रथम श्रेणी सामने खेळायचे आहेत. यातील एक इंटर-स्क्वाड सामना असणार आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. भारताच्या तिलक वर्मा, रिंकू सिंग यांनी सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेला जात असतानाचा विमानातील फोटो शेअर केला आहे.

याशिवाय दक्षिण आफ्रिकेला भारतीय खेळाडू रवाना होत असतानाचा व्हिडिओही पीटीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफ सदस्यही बसमध्ये बसल्याचे दिसत आहेत.

असा आहे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

भारतीय संघ 10 ते 14 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे डर्बन, पोर्ट एलिझाबेथ आणि जोहान्सबर्ग येथे रंगाणार आहेत.

त्यानंतर 17 ते 21 डिसेंबर दरम्यान वनडे मालिका होणार आहे. या मालिकेतील सामने जोहान्सबर्ग, पोर्ट एलिझाबेथ आणि पार्ल येथे पार पडतील. त्यानंतर 26 ते 30 डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना सेंच्युरियनला होणार आहे. तर 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान दुसरा कसोटी सामना केपटाऊनला होणार आहे.

या मालिका सुरु असतानाच 11 ते 14 डिसेंबर दरम्यान भारत अ संघाचा पहिला चार दिवसीय सामना रंगणार आहे. त्यानंतर 20 ते 22 डिसेंबर दरम्यान दुसरा सामना होणार आहे. दुसरा सामना इटर-स्क्वाड सामना असणार आहे. म्हणजेच भारतीय संघाचेच दोन संघात हा सामना होईल. यानंतर 26 ते 29 डिसेंबर दरम्यान तिसरा चार दिवसीय सामना होणार आहे.

इंटर स्क्वाड सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल असे अनेक खेळाडूही खेळताना दिसणार आहेत.

तीन कर्णधार

दरम्यान, वनडे आणि टी20 मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे, तर वनडेत केएल राहुल नेतृत्व करेल, तर कसोटीत रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

असे आहेत भारतीय संघ

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

टी20 मालिका

  • 10 डिसेंबर - पहिला टी20 सामना, डर्बन (वेळ- रात्री ९.३० वाजता)

  • 12 डिसेंबर - दुसरा टी20 सामना, पोर्ट एलिझाबेथ (वेळ- रात्री ९.३० वाजता)

  • 14 डिसेंबर - तिसरा टी20 सामना, जोहान्सबर्ग (वेळ- रात्री ९.३० वाजता)

वनडे मालिका

  • 17 डिसेंबर - पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग (वेळ - दुपारी १.३० वाजता)

  • 19 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, पोर्ट एलिझाबेथ (वेळ - दुपारी ४.३० वाजता)

  • 21 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, पार्ल(वेळ - दुपारी ४.३० वाजता)

कसोटी मालिका

  • 26 ते 30 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन (वेळ - दुपारी १.३० वाजता)

  • 3 ते 7 जानेवारी - दुसरी कसोटी सामना, जोहान्सबर्ग (वेळ - दुपारी २.०० वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT