Surya And Arshdeep
Surya And ArshdeepDainik Gomantak

IND vs AUS: रोमांचक विजयानंतर अर्शदीपनं सांगितलं शेवटच्या षटकापूर्वीचं गुपित; म्हणाला, ''सूर्याने मला...''

India vs Australia, 5th T20I: भारताने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना 6 धावांनी जिंकला.
Published on

India vs Australia, 5th T20I: भारताने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना 6 धावांनी जिंकला. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि ऑस्ट्रेलियाला 154/8 मध्ये रोखले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5व्या टी-20 सामन्यात भारताला शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवून देणाऱ्या अर्शदीप सिंगने सामन्यानंतर सांगितले की, त्या महत्त्वाच्या षटकाच्या आधी कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत काय बातचीत झाली. सामन्याच्या शेवटच्या षटकात कांगारुंना विजयासाठी 10 धावांची गरज होती. पहिल्या तीन षटकांत 37 धावा देणाऱ्या अर्शदीप सिंगकडे कर्णधार सूर्याने भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी सोपवली. टीम इंडिया या सामन्यातही 5 गोलंदाजांसह मैदानात उतरली होती, त्यामुळे सूर्याला शेवटचे षटक अर्शदीपला देण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, षटकाच्या आधी सूर्याने आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावला.

सामन्यानंतर अर्शदीप सिंग म्हणाला की, ''मी विचार करत होतो की मी खूप धावा दिल्या आहेत (पहिल्या तीन षटकांमध्ये) आणि आणखी एक संधी मिळण्याची आशा होती, आणि देवाचे आभार, मी धावसंख्या रोखू शकलो आणि स्टाफचेही धन्यवाद की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. सूर्याने (शेवटचे षटक टाकण्यापूर्वी) मला सांगितले की, जे होईल ते होईल... आणि याचे श्रेयही फलंदाजांना जाते.''

Surya And Arshdeep
IND vs AUS: रवी बिश्नोईच्या फिरकीची जादू! 9 विकेट्ससह आर अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी

दरम्यान, टीम इंडियाने या मालिकेत आधीच 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली होती, त्यामुळे सूर्याला शेवटच्या षटकात आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवायचा होता. भारताने 5वी टी-20 गमावली असती तरी 3-2 ने मालिका जिंकली असती. याच कारणामुळे सूर्याने अर्शदीपला शेवटच्या षटकात मोकळेपणाने गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.

दुसरीकडे, अर्शदीप सिंग या मालिकेतील त्याच्या कामगिरीवर फारसा खूश दिसत नाही. ज्यापद्धतीने टीम इंडियामध्ये एक स्टॅंडर्ड सेट सेट झाला आहे त्यानुसार मी कामगिरी करु शकलो नाही, असेही तो पुढे म्हणाला. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक हारुन प्रथम फलंदाजी स्वीकारताना टीम इंडियाने श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 8 गडी गमावून 160 धावा केल्या होत्या. अय्यरने 37 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची सर्वोच्च खेळी खेळली, तर अक्षर पटेलने 7 व्या क्रमांकावर येऊन 31 धावा करत त्याला पूर्ण साथ दिली.

Surya And Arshdeep
IND vs AUS: परंपरा कायम! पहिली टी20 मालिका जिंकताच कर्णधार सूर्यकुमारने कोणाकडे सोपवली ट्रॉफी, पाहा Video

दरम्यान, या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या वतीने बेन मॅकडरमॉटने भारताला घायगुतीला आणले होते. त्याने 36 चेंडूत 5 षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी खेळली. बेन मॅकडरमॉटने या डावात एकही चौकार मारला नाही. मात्र त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. मात्र, अखेर ऑस्ट्रेलिया भारताच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचला होता. शेवटच्या षटकात कांगारुंना फक्त 10 धावांची गरज होती, पण अर्शदीप सिंगच्या शानदार गोलंदाजीमुळे टीम इंडियाने केवळ 3 धावा देऊन सामना जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com