Chetan Sharma Dainik Gomantak
क्रीडा

New Chief Selector: BCCI चा मोठा निर्णय, चेतन शर्मा यांची पुन्हा मुख्य सिलेक्टर्स पदी निवड

Team India New Chief Selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नवीन निवड समितीची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Team India New Chief Selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन निवड समितीची घोषणा केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय समितीची घोषणा केली आहे. चेतन शर्मा यांची पुन्हा एकदा मुख्य सिलेक्टर्स पदी निवड करण्यात आली आहे. T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर, चेतन शर्मा यांचा समावेश असलेल्या निवड समितीला BCCI ने बरखास्त केले होते. पाच सदस्यीय समितीमध्ये चेतन शर्मा यांच्याशिवाय शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरत यांची निवड करण्यात आली आहे.

चेतन शर्मा यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी

सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या सीएसीने या पाच सदस्यीय समितीची निवड केली आहे. चेतन शर्मा यांना सलग दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेटचे मुख्य सिलेक्टर्स बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाला निवड समितीसाठी जवळपास 600 अर्ज आले होते, त्यापैकी 11 जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. चेतन शर्मा यांची उत्तर विभागातून, श्रीधरन शरत दक्षिण विभागातून, सलील अंकोला पश्चिम विभागातून, शिव सुंदर दास पूर्व विभागातून आणि मध्य विभागातून सुब्रतो बॅनर्जी यांची निवड करण्यात आली आहे.

बड्या दिग्गजांनी अर्ज केला होता

चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांनी मुख्य सिलेक्टर्सच्या पदासाठी पुन्हा अर्ज केला होता. त्यात व्यंकटेश प्रसाद, नयन मोंगिया, मनिंदर सिंग, अतुल वासन, निखिल चोप्रा, अमय खुर्सिया, ज्ञानेंद्र पांडे आणि मुकुंद कुमार यांचाही समावेश होता.

यापूर्वी, बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने सांगितले होते की, 'चेतन आणि त्यांची समिती अजूनही देशांतर्गत क्रिकेट पाहत आहेत. त्यांनी विजय हजारे ट्रॉफीचे संपूर्ण सामने पाहिले आहेत. या समितीच्या सदस्यांनी रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन फेऱ्यांचे सामनेही पाहिले आहेत. बंगाल आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील सामना पाहण्यासाठी देबाशिष मोहंती ईडन गार्डन्सवर उपस्थित होते. त्यांना 25 डिसेंबरपर्यंत दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.'

दोन विश्वचषक गमावले

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला (Team India) आतापर्यंत एकही मोठे जेतेपद पटकावता आलेले नाही. शर्मा यांच्या मागील कार्यकाळात टीम इंडियाला 2021 आणि 2022 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर 2022 साली आशिया चषकही गमावला होता, त्यामुळे आता चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीवर मोठा दबाव असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT