Team India: टीम इंडियाच्या 'या' 7 दिग्गज खेळाडूंवर BCCI ची कारवाई, करिअर वाचवण्यासाठी...!

Indian Cricket Team: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. 16 सदस्यीय संघात बहुतांश युवा खेळाडूंना स्थान मिळाले.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Cricket Team: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. 16 सदस्यीय संघात बहुतांश युवा खेळाडूंना स्थान मिळाले. संघात वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि मुकेश कुमार यांच्या रुपाने दोन नवे चेहरे आहेत. यावेळी निवड समितीने मोठ्या नावांऐवजी युवा खेळाडूंना प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये हा बदल झाला आहे. भारतीय संघ केवळ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठू शकला होता. मात्र, त्या सामन्यात त्यांचा इंग्लंडकडून (England) 10 गडी राखून पराभव झाला होता. या स्पर्धेतील फ्लॉप शोनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची मागणी होत होती.

Team India
Team India: रिक्षाचालकाच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री! पाहा कशी आहे आजपर्यंतची कामगिरी

7 दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला

टी-20 विश्वचषकात संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) होते. त्याचवेळी केएल राहुल उपकर्णधार होता. या दोन्ही खेळाडूंची स्पर्धेत सरासरी कामगिरी होती. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आता श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. या दोन दिग्गज खेळाडूंशिवाय माजी कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. असे मानले जाते की, ऋषभ पंत वगळता सर्व खेळाडूंची टी-20 कारकीर्द जवळपास संपली आहे.

तसेच, पुढील T20 विश्वचषक दोन वर्षांनी म्हणजेच, 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाईल. अशा परिस्थितीत नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी सिलेक्टर्सकडे पूर्ण वेळ आहे. दोन वर्षांनंतर विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, दिनेश कार्तिक हे वयाच्या त्या टप्प्यावर असतील जिथून खेळाडू निवृत्तीकडे पाहतात. अशा परिस्थितीत बीसीसीआयला आता या खेळाडूंकडे लक्ष द्यावे लागणार असून त्या दिशेने पावलेही उचलली आहेत.

Team India
Team India: टीम इंडियात 'या' खेळाडूला संधी मिळणे झाले बंद, आशिया कप 2022 मध्ये...!

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ - हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवमंदन मलिक. आणि मुकेश कुमार.

Team India
Team India: भारताचा विजय अन् पाकिस्तानला झटका, 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या...'

T20 विश्वचषकातील संघ कोणता होता- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, यजुवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार , हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com