Suryakumar Yadav  Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: दुसऱ्या वनडेत सूर्याला संधी? 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी भारताच्या संघात दोन बदल होऊ शकतात.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना गुरुवारी होणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होऊ शकतात. पहिल्या सामन्यात चांगल्या लयीत असलेल्या सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली नव्हती. त्याच्याऐवजी गेल्यावर्षी वनडेत सरस कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला पसंती देण्यात आली होती.

पण दुसऱ्या वनडे सामन्यासाठी श्रेयस अय्यरला बाहेर बसवून सूर्यकुमारला आजमावू शकतात. तो सध्या दमदार फॉर्ममध्ये असून त्याने वनडे मालिकेपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत शतक झळकावले होते.

(Team India Predicted playing XI for 2nd ODI against Sri Lanka)

त्याचबरोबर खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेतून भारतीय संघात पुनरागमन केले होते. पण शमीसाठी वैयक्तिकरित्या हा सामना तेवढा खास राहिला नाही. त्याने 1 विकेट घेतली, पण त्याने 7.44 च्या इकोनॉमी रेटने 67 धावा दिल्या होत्या.

त्यामुळे त्याच्याऐवजी दुसऱ्या वनडेसाठी अर्शदीप सिंगला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT