Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: वेस्ट इंडिजमध्ये पोहचताच टीम इंडियात रंगला व्हॉलिबॉलचा खेळ, व्हिडिओ व्हायरल

Video: वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहचलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा बीचवर व्हॉलिबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Team India players played beach volleyball in Barbados: भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात कसोटी, टी20 आणि वनडे अशा तिन्ही मालिका खेळल्या जाणार आहेत. पण आधी 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे सध्या भारताचा कसोटी संघ या दौऱ्यासाठी बार्बाडोसला पोहोचला आहे.

बार्बाडोसला पोहचलेल्या भारतीय संघाचा एक व्हिडिओ सोमवारी (3 जुलै) बीसीसीआने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघ समुद्र किनाऱ्यावर बीच व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहे.

यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली, शार्दुल ठाकूर, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोहम्मद सिराज असे अनेक खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर भारताच्या सपोर्ट स्टाफमधील मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासह अन्य सदस्यही खेळताना दिसत आहेत.

तसेच व्हिडिओच्या शेवटी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनी माहिती दिली की दोन दिवस खेळाडूंना जेट लॅगमधून बाहेर येण्यासाठी आणि प्रवासाचा शीण घालवण्यासाठी देण्यात आले होते. आता उद्यापासून संघ सरावाला सुरुवात करणार आहे.

भारतीय संघात नवे चेहेरे

भारताच्या कसोटी संघातून चेतेश्वर पुजारा, उमेश यादव अशा अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आले असून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाज, मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात

कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेला ऍशेस 2023 मालिकेपासून म्हणजेच 16 जूनपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारत आणि वेस्ट इंडिज संघही कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.

असा आहे वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ -

  • भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

  • भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

असे आहे भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • कसोटी मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- संध्या. 7.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    12 - 16 जुलै - पहिला कसोटी सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका

    20 - 24 जुलै - दुसरा कसोटी सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

  • वनडे मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत)- वेळ- संध्या. 7.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    27 जुलै - पहिला वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    29 जुलै - दुसरा वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    1 ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

  • टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

    6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

    13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT