Bairstow Run-Out: पाय घासून पुढं आला तरी बेअरस्टो रनआऊट कसा झाला? नियम नक्की आहे काय?

Ashes 2023: लॉर्ड्स कसोटीत जॉनी बेअरस्टोला देण्यात आलेल्या रनआऊटच्या निर्णयाने चर्चेला उधाण आले आहे.
Jonny Bairstow Wicket
Jonny Bairstow WicketDainik Gomantak

Jonny Bairstow's Controversial Run-Out: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे. पण अशातच लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या या सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोची विकेट वादग्रस्त ठरली.

झाले असे की या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 371 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या. पण नंतर बेन स्टोक्स आणि बेन डकेट यांनी 5 व्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली.

पण डकेट 83 धावांवर बाद झाला. त्यामुळे बेअरस्टो फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने कर्णधार स्टोक्सला चांगली साथ देण्यास सुरुवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ५२ वे षटक टाकणाऱ्या कॅमेरॉन ग्रीनने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला.

त्यावर बेअरस्टोने तो चेंडू सोडून दिला. त्यामुळे चेंडू मागे यष्टीरक्षण करणाऱ्या ऍलेक्स कॅरेकडे गेला. पण चेंडू कॅरेकडे गेला तेव्हा बेअरस्टोने फक्त पाय खाली घासला आणि तो पुढे निघून गेला. त्याने क्रीज सोडल्याचे पाहून कॅरेने चेंडूवर स्टंपवर फेकला. त्यामुळे बेअरस्टोला पंचाकडून १० धावांवर असताना बाद देण्यात आले.

Jonny Bairstow Wicket
Ashes 2023: गिल आऊट, पण डकेट नॉटआऊट! स्टार्कच्या कॅचवर चर्चांना उधाण, पण नियम काय सांगतो?

त्याचमुळे सध्या बेअरस्टो नाबाद असल्याचे काही जणांनी म्हटले, तर काहींनी म्हटले की बेअरस्टोला धावबाद देणे योग्य होते. तसेच लॉर्ड्समधील काही प्रेक्षकांकडून ऑस्ट्रेलियन संघाची हुर्याही उडवण्यात आली.

मात्र, बेअरस्टोला नियमानुसार बाद देण्यात आल्याचे पंचांच्या निर्णयानुसार सध्या तरी दिसून येत आहे. कारण बेअरस्टो जेव्हा पुढे निघाला होता, तेव्हा चेंडू खेळून पूर्ण झाला नव्हता. साधारत: फलंदाज यष्टीरक्षकाने चेंडू पकडला आहे का आणि त्यानंतर चेंडू पूर्ण खेळून झाला आहे का म्हणजे चेंडू डेड बॉल झाला आहे का हे निश्चित झाल्यानंतर क्रिज सोडतात.

पण बेअरस्टोने तसे केले नाही आणि त्याने तो धाव घेत नसल्याचा इशारा यष्टीरक्षक किंवा स्लीपला क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूलाही न करताच पुढे गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्याच्या विरुद्ध धावबादसाठी अपील केले.

Run Out Rule
Run Out RuleDainik Gomantak

काय आहे नियम

दरम्यान क्रिकेटच्या 38.1 नियमानुसार जर चेंडू डेड होण्यापूर्वीच फलंदाजाने क्रिज सोडली आणि जर क्षेत्ररक्षकाने योग्य पद्धतीने स्टंम्पवरील बेल्स उडवले, तर फलंदाज बाद असतो. मग तो नो बॉल असला तरी आणि जरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात असला किंवा नसला तरी.

Jonny Bairstow Wicket
Ashes 2023 Video: जरा विचित्रच! लॅब्युशेनने ग्राउंडवरील च्युइंगम पुन्हा टाकलं तोंडात, घटना कॅमेऱ्यात कैद

सामना रोमांचक वळणावर

दरम्यान बेअरस्टो बाद झाल्यानंतर स्टोक्सने आक्रमक पवित्रा आक्रमत शतक पूर्ण केले. त्यामुळे या सामन्यात अखेरच्या दिवसाच्या पहिल्या सत्रानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 57 षटकात 6 बाद 243 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता अखेरच्या दोन सत्रात इंग्लंडला विजयासाठी 128 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सची गरज आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 100.4 षटकात सर्वबाद 416 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात 76.2 षटकात सर्वबाद 325 धावाच करता आल्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 279 धावा करता आल्या. तसेच त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 91 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे आव्हान ठेवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com