Jasprit Bumrah  Dainik Gomantak
क्रीडा

Jasprit Bumrah: न्यूझीलंडमध्ये झाली बुमराहची सर्जरी! जाणून घ्या कधी करू शकतो बॉलिंगला सुरुवात

जसप्रीत बुमराहवर नुकतीच न्यूझीलंडमध्ये सर्जरी झाल्याचे समोर आले आहे.

Pranali Kodre

Jasprit Bumrah Surgery: भारताचा वेगवान गोलंगाज जसप्रीत बुमराह गेल्या ६ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. आता अशी माहिती मिळाली आहे की बुमराहच्या पाठीवर सर्जरी करण्यात आली आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी न्यूझीलंडमध्ये बुमराहच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तो या महिन्यात न्यूझीलंडमध्येच थांबणार आहे. साधारण महिन्याभरानंतर तो मायदेशी परतेल.

या शस्त्रक्रियेमुळे आता बुमराह आयपीएल 2023 बरोबरच जर भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचला तर त्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तसेच तो यावर्षीच्या आशिया चषकालाही मुकण्याची दाट शक्यता आहे.

तो आता ऑगस्टमध्ये पुन्हा ट्रेनिंगला सुरुवात करू शकतो. त्यामुळे तो यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळू शकेल.

बुमराह गेल्या 6 महिन्यांपासून मैदानातून दूर

बुमराह गेल्या 6 महिन्यांपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. त्याला गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतून पुनरागमन केले होते. पण पुन्हा त्याच्या दुखापतीने डोके वर केल्याने तो भारतीय संघातून बाहेर झाला.

त्याला गेल्यावर्षी आशिया चषक आणि टी20 वर्ल्डकपलाही मुकावे लागले. दरम्यान, त्याने बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सरावाला सुरुवात केली होती. तसेच यावर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. पण त्यानंतरही त्याला पाठीच्या दुखापतीचा समस्या जाणवत असल्याने त्याने पुन्हा या मालिकांमधून माघार घेतली.

त्यानंतर बीसीसीआयच्या मेडिकल स्टाफने त्याला शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आता बुमराहने त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. दरम्यान, आता बुमराहचे पुनरागमन कधी आणि कसे होणार याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

बुमराहने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता.

जसप्रीत बुमराहची कामगिरी

बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत कसोटीत 30 सामन्यांत 128 विकेट्स घेतल्या. तसेच 72 वनडे सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 70 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT