India vs Australia 4th Test, Ahmedabad: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवार, 9 मार्चपासून सुरु होत आहे.
मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. टीम इंडियासाठी हा सामना एक नाही तर चार कारणांसाठी खूप खास आहे.
भारतीय संघाने या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने जिंकले. नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या त्या कसोटी सामन्यांमध्ये भारताने (India) 3-3 दिवसांत विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
मात्र, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने विजयाची नोंद करुन मालिकेत पुनरागमन केले. आता या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. अहमदाबाद कसोटीत विजय मिळाला तर भारत 3-1 ने मालिका जिंकेल.
अहमदाबाद कसोटीही भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे, कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे (WTC Final) तिकीटही त्यात जोडलेले आहे.
इंदूर कसोटी जिंकताच ऑस्ट्रेलियाला (Australia) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे (WTC Final) तिकीट मिळाले.
आता, भारताला यासाठी अहमदाबाद कसोटीही जिंकावी लागणार आहे. ICC कसोटी चॅम्पियन होण्यासाठी हा सामना 7 जून 2023 पासून खेळवला जाईल.
हा सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियमवर पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही असतील.
अशा परिस्थितीत खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल. दोन्ही देशांच्या खेळाडूंना आपापल्या पंतप्रधानांसमोर खेळताना चांगली कामगिरी करायला आवडेल.
विशेष म्हणजे, या स्टेडियमचे नावही नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आहे. चौथे कारण म्हणजे स्टेडियमच, ज्याची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये केली जाते. एवढेच नाही तर खेळपट्टीचा मूडही वेगळा असणे अपेक्षित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.