Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: आज होणार टीम इंडियाची घोषणा? हार्दिक पंड्याला मिळू शकते मोठी जबाबदारी

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड होऊ शकते.

Pranali Kodre

Team India: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 3 जानेवारीपासून भारताला श्रीलंकेविरुद्ध 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप नवीन निवड समीतीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे जुनीच निवड समीती भारतीय संघाची निवड करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशी चर्चा आहे की केएल राहुल त्याच्या लग्नाच्या कारणाने या मालिकांमध्ये खेळणार नाही. तसेच रोहित शर्मा अद्याप त्याच्या अंगठ्याच्या दुखापतीतून सावरत असल्याने टी20 मालिकेत खेळणार नाही. अशा परिस्थितीत टी20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.

तसेच टी20 संघात काही युवा खेळाडूंनाही संधी दिली जाऊ शकते, तर ऋषभ पंत आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे या मालिकेत राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच हे देखील पाहावे लागेल की रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू पूर्ण तंदुरुस्त आहेत की नाही.

दरम्यान, टी20 संघात गोलंदाजी फळीत युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मोहम्मद सिराज यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

वनडे मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार रोहित शर्माचे या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. तसेच केएल राहुल नसल्याने शुभमन गिलचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर वनडेतील नियमित सदस्य शिखर धवनलाही संधी मिळू शकते.

त्याचबरोबर विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव यांना दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. तसेच गोलंदाजी फळीत दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूरही दिसू शकतात.

भारत विरुद्ध श्रीलंका वेळापत्रक -

आंतरराष्ट्रीय टी20 मालिका

3 जानेवारी - पहिला टी20 सामना, मुंबई

5 जानेवारी - दुसरा टी20 सामना, पुणे

7 जानेवारी - तिसरा टी20 सामना, राजकोट

वनडे मालिका

10 जानेवारी - पहिला वनडे, गुवाहाटी

12 जानेवारी - दुसरा वनडे, कोलकाता

15 जानेवारी - तिसरा वनडे, तिरुअनंतपुरम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT