South Africa vs India
South Africa vs India PTI
क्रीडा

SA vs IND, Test: भारताची द. आफ्रिका काबीज करण्याची संधी पुन्हा हुकली, 9व्यांदा मालिका जिंकण्यात अपयश; पाहा निकाल

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion:

भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी (28 डिसेंबर) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. सेंच्युरियनला झालेल्या या बॉक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्याच दिवशी विजयाची नोंद केल्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

मात्र, या पराभवामुळे भारताचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न मात्र पुन्हा एकदा भंगले. ही दोनच सामन्यांची मालिका आहे, त्याचमुळे पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकल्याने भारतीय संघाला मालिका विजयाची संधी नाही.

भारतीय संघाने जर केपटाऊनला होणारा दुसरा सामना जिंकला, तर मालिकेत बरोबरी होऊ शकते. तसेच दुसरा सामना पराभूत झाला किंवा अनिर्णित राहिला, तर दक्षिण आफ्रिका मालिकेत विजय मिळवेल. त्याचमुळे भारताची दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची प्रतिक्षा कायम राहिली आहे.

दरम्यान, ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील भारताची नववी कसोटी मालिका आहे. यापूर्वी झालेल्या आठही कसोटी मालिकेत भारताने विजय मिळलेला नाही. या आठ मालिकांपैकी 7 मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे, तर एकदाच या दोन संघातील मालिका बरोबरीत सुटली आहे.

2010-11 साली झालेली कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त 1992-93, 1996-97, 2001-02, 2006-07, 2013-14, 2017-18 आणि 2021-22 या वर्षात भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला होता.

साल 2023 पूर्वीच्या दक्षिण आफ्रिकेतील भारताच्या कसोटी मालिका

1992-93 -

  • चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 1-0 अशा फरकाने पराभूत केले होते.

1996-97 -

  • तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 अशा फरकाने पराभूत केले.

2001-02 -

  • दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 1-0 अशा फरकाने पराभूत केले.

2006-07 -

  • तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-1 अशा फरकाने पराभूत केले.

2010-11

  • दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली होती.

2013-14

  • दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 1-0 अशा फरकाने पराभूत केले.

2017-18

  • तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-1 अशा फरकाने पराभूत केले.

2021-22

  • तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-1 अशा फरकाने पराभूत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: आसगाव घर मोडतोड प्रकरणातील चार संशयितांना जामीन

Sada Varunapuri Highway: सडा-वर्णापुरी येथे होते आहे अवैध मासळी विक्री!

Electricity Bill: नागरिकांचा वीज बिले न भरण्याचा इशारा! भुईपाल, पिसुर्ले येथील ग्रामस्थ हैराण

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगाच्यावेळी चेंगराचेंगरी, 27 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 25 महिलांचा समावेश

Mopa Airport: पार्किंग शुल्क वाढीवरुन टॅक्सी चालक संतप्त, मोपावर तणाव; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

SCROLL FOR NEXT