AUS vs PAK, Video: कमिन्स-कॅरे पळाले चक्क 5 धावा, पाकिस्तानचा फिल्डिंगमध्ये सावळा गोंधळ

Running 5 runs: पाकिस्तानविरुद्ध सुरु असेलल्या मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि ऍलेक्स कॅरे यांनी 5 धावा पळून काढल्या.
Australia vs Pakistan
Australia vs PakistanX/cricketcomau
Published on
Updated on

Pat Cummins and Alex Carey running 5 runs during Australia vs Pakistan Melbourne Test:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात मंगळवारपासून (26 डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी एक दुर्मिळ गोष्ट घडली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चक्क 5 धावा पळून काढल्या.

झाले असे की या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होते. त्यावेळी 75 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरे खेळपट्टीवर होते, तर अमीर जामेल गोलंदाजी करत होता.

Australia vs Pakistan
AUS vs PAK: ऐकावं ते नवलंच! अंपायरच अडकले लिफ्टमध्ये, सामनाही थांबला; वाचा नक्की झालं काय

अमीरने टाकलेल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कमिन्सने कव्हर्समध्ये फटका मारला. त्यावर कमिन्स आणि कॅरे यांनी आधी 2 धावा पळून काढल्या, याचवेळी पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू गोलंदाजाच्या एन्डला फेकला, पण शाहिन शाह आफ्रिदी चेंडू अचूक पकडू शकला नाही, त्यामुळे ओव्हरथ्रो झाला आणि चेंडू आणखी दूर गेला.

ते पाहून कमिन्स आणि कॅरे पुन्हा पळायला लागले. त्यांनी त्या ओव्हरथ्रोचा चेंडू क्षेत्ररक्षक पकडून पुन्हा खेळपट्टीच्या दिशेने फेकण्यापर्यंत तीन धावा धावल्या. त्यामुळे कमिन्स आणि कॅरे हे या एका चेंडूवर एकूण 5 धावा पळाले.

या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. खरंतर क्रिकेटमध्ये एकेरी, दुहेरी आणि तिहेरी धावा धावणे सामन्य गोष्ट आहे. पण फार क्वचितच असे होते की एकाच चेंडूवर फलंदाज 5 धावा धावतात.

Australia vs Pakistan
AUS vs PAK, Video: कबुतर जा जा! स्मिथने तक्रार करताच लॅब्युशेनने उडवलं पक्ष्यांना, पाकिस्तानी बॉलरचीही मदत

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 262 धावांवर संपुष्टात आला. पण पहिल्या डावातील 54 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ३३ षटकात 3 बाद 129 धावा केल्या आहेत.

या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 96.5 षटकात सर्वबाद ३१८ धावा केल्या होत्या. तसेच पाकिस्तानने नंतर 73.5 षटकात सर्वबाद 264 धावा केल्या. त्यामुळे त्यांना ५४ धावांची पिछाडी स्विकारावी लागली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com