Team India Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 च्या धामधुमीत BCCI ची WTC Final साठी योजना तयार! तीन तुकड्यात टीम इंडिया निघणार दौऱ्यावर

आयपीएल 2023 नंतर भारताला जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीपची फायनल खेळायची आहे.

Pranali Kodre

WTC Final 2023, India vs Australia: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेत अखेरचे 10 दिवस राहिले आहेत. 28 मे रोजी आयपीएलच्या या 16 व्या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. अशातच बीसीसीआयने आगामी कसोटी चॅम्पिनयनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी सुरू केली आहे.

भारतीय संघाला आयपीएलनंतर लगेचच 7 ते 11 जून दरम्यान पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पिनयनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

दरम्यान, क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार या सामन्यासाठी तीन टप्प्यात भारतीय संघ इंग्लंडला जाणार आहे. भारतीय संघातील काही सदस्य 23 मे रोजी इंग्लंडला जातील.

त्यानंतर प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्आत काही खेळाडू इंग्लंडला रवाना होतील. तसेच नंतर 30 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात भारतीय संघातील उर्वरित सर्वच सदस्य इंग्लंडला पोहोचतील.

सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. यात भारताचा चेतेश्वर पुजारा, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ असे काही खेळाडूही खेळत आहेत. पण या हंगामामुळे अनेक काऊंटी संघ त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या सराव सामन्याबद्दल अद्याप काही स्पष्ट झालेले नाही.

भारत दुसऱ्यांदा खेळणार अंतिम सामना

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची ही भारताची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2021 साली पहिल्यांदाच झालेल्या कसोटी चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

त्यावेळी न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने मात केली होती. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता भारताला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

भारत - ऑस्ट्रेलिया संघांची घोषणा

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारतीय संघ -

    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

    राखीव खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव

  • ऑस्ट्रेलिया संघ -

    पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT