ICC announced a major change to the Playing Conditions: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील द ओव्हल मैदानात कसोटी चॅम्पियनशीपचा (WTC) अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले आहे.
आयसीसीने जाहीर केल्याप्रमाणे नियमांमधील बदलांचा अवलंब 1 जून 2023 पासून केला जाईल. या बदलल्या नियमांमधील सॉफ्ट सिग्नलचा महत्त्वाचा नियम आहे.
यापूर्वी तिसऱ्या पंचांकडे जेव्हा झेल तपासण्यासाठी जायचा, तेव्हा मैदानावरील पंचांना बाद की नाबाद याबद्दल सॉफ्ट सिग्नल द्यावा लागत होता. त्यावेळी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यासाठी तिसऱ्या पंचांना निर्णयकारक पुरावे असणे आवश्यक होते. पण या नियमाबाबत क्रिकेटविश्वातून नाराजी व्यक्त होत होती.
त्यामुळे आता बदललेल्या नियमानुसार, ज्यावेळी झेल तपासण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर येईल, तेव्हा त्यांनांच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. नुकताच भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने प्लेइंग कंडिशन्सवर पुन्हा विचार केला आहे. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, गांगुली जेव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष होता, तेव्हा दोन वर्षांपूर्वी आयपीएलमधूनही सॉफ्ट सिग्नल रद्द करण्यात आला होता.
याशिवाय अन्य काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहे. यामध्ये फ्लड लाईट्स, फ्रि-हिट आणि हेल्मेट अशा बाबतीतील नियमांचा समावेश आहे.
कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी फ्लड लाईट्स
आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी फ्लड लाईट्स वापरण्याची परवानगी दिली. तसेच 2021 साली झालेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ज्याप्रमाणे राखीव दिवस ठेवण्यात आलेला, त्याचप्रमाणे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
फ्रिट-हिटच्या नियमात थोडा बदल
फ्रि हिटच्या नियमातही थोडा बदल करण्यात आला आहे. जर एखादा फलंदाज फ्रि हिटवर त्रिफळाचीत झाला आणि तरी तो पळून धावा काढू शकतो. त्या बाईज समजल्या जाणार नाहीत. पण त्या धावा अतिरिक्त धावा म्हणून समजल्या जातील
हेल्मेट सक्तीचे
मैदानात चेंडू लागण्याचे वाढते प्रमाण पाहाता क्रिकेट समीतीने वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजांना, स्टंपजवळ थांबताान यष्टीरक्षकांना आणि खेळपट्टीच्या जवळ असलेल्या क्षेत्ररक्षकांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.