Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा चमकतोय मुकुट; पण...

हिटमॅनने जेव्हापासून टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून सातत्याने विजय मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या एका युगाची सुरुवात चांगली झाली आहे. हिटमॅनने जेव्हापासून टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून सातत्याने विजय मिळत आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने जितक्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यात टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाहीये. श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय नोंदवला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. (Team India has been winning consistently since Rohit Sharma took over the reins)

धर्मशाला येथील विजयासह, रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनला आहे, तर रोहितने 17 व्या सामन्यात विक्रमी 16 वा विजय नोंदवून इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आणि केन विल्यमसन (Ken Williamson) यांना मागे टाकले आहे.

एवढेच नाही तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका देखील जिंकली आहे. यापूर्वीही, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता.

टीम इंडियाचा (Team India) हा T20 सामन्यांमधला सलग 11वा विजय आहे, भारताने T20 विश्वचषकातील शेवटचे तीन सामने जिंकले आणि त्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. इतकेच नाही तर 2019 पासून घरच्या मैदानावरील भारताचा हा सलग सातवा टी-20 मालिका विजय आहे.

हा सामना रोहित शर्मासाठी वैयक्तिकरित्या चांगला नव्हता आणि तो पहिल्याच ओव्हमध्ये वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीराच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. चमीराने रोहितला आउट करण्याची ही पाचवी वेळ आहे. रोहित शर्माने T20 मध्ये आजपर्यंत रोहितला 26 चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये केवळ 32 धावा केल्या आहेत, तर तो 5 वेळा आउट झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT