India Test Team  Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Ranking: टीम इंडिया कसोटीत पुन्हा नंबर वन! कांगारूंना मोठा धक्का

भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आला आहे.

Pranali Kodre

ICC Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत भारतीय संघाला फायदा झाला आहे. या क्रमवारीनुसार भारतीय संघ पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.

भारताने या क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावताना ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीनुसार भारतीय संघ कसोटी क्रमवारीत 115 रेटिंग पाँइंटसह अव्वल क्रमांकावर आला आहे, तर पॅट कमिन्स कर्णधार असलेला ऑस्ट्रेलिया संघ 111 रेटिंग पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

भारताने अखेरची कसोटी मालिका डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळली होती. यात भारताने 2-0 असा विजय मिळवला होता. तसेच ऑस्ट्रेलियाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते, पण तिसरा सामना अनिर्णित राहिला.

दरम्यान, आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलियाचे 5 रेटिंह पाँइंट्स कमी झाले आहेत. याआधी ते 116 रेटिंग पाँइंट्ससह ते पहिल्या क्रमांकावर होते. पण, त्यांचे रेंटिंग पाँइंट्स कमी झाल्याने भारताच्या खाली आले आहेत. भारतीय संघाचे 115 रेटिंग पाँइंट्स कायम आहेत, पण ऑस्ट्रेलियापेक्षा ते जास्त असल्याने भारताला अव्वल क्रमांक मिळाला.

भारतीय संघ याआधी 2016 ते 2021 अशा सलग 6 वर्ष अव्वल क्रमांकावर होता. त्यानंतर भारताच्या क्रमवारीत चढ-उतार पाहायला मिळाले. पण, तरी भारतीय संघाची कसोटीतील कामगिरी चांगली राहिली आहे.

विशेष गोष्ट अशी की भारतीय संघ आयसीसीच्या क्रमवारीत टी20 प्रकारातही क्रमांक एकवर विराजमान आहे. तसेच वनडेमध्ये भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेदरम्यान आता क्रमवारीतही अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी या दोन संघात चढाओढ दिसू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT