Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा झटका! वनडे मालिकेतून घातक खेळाडू आऊट, 'या' खेळाडूला संधी

Pranali Kodre

India vs New Zealand, ODI Series: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याच्या एक दिवसआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतून बाहेर पडला आहे. याबद्दल मंगळवारी बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे तो या मालिकेला मुकणार आहे.

श्रेयस अय्यरच्या जागेवर निवड समीतीने मध्य प्रदेशचा 29 वर्षीय फलंदाज रजत पाटीदारला भारतीय संघात संधी दिली आहे. रजत पाटीदार सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या 10 डावात 7 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे.

दरम्यान श्रेयस अय्यर आता त्याच्या दुखापतीवर काम करण्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाईल. तो न्यूझीलंडविरुद्ध वनडेनंतर होणाऱ्या टी20 मालिकेचाही भाग नाही.

त्यामुळे आता श्रेयस थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झालेल्या भारतीय संघाचा तो भाग आहे. पण आता त्याची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवरही अवलंबून असेल.

श्रेयस अय्यर भारताच्या वनडे संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने गेल्यावर्षी भारताकडून सर्वाधिक धावा देखील केल्या होत्या. त्याने 2022 वर्षात वनडेमध्ये 17 सामन्यांत 55.69 च्या सरासरीने 724 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या एका शतकाचा आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच तो गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 2022 वर्षात 39 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 1609 धावा केल्या होत्या.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या आगामी वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी हैदराबादला होणार आहे. त्यानंतर 21 जानेवारी रोजी दुसरा वनडे सामना रायपूरला आणि तिसरा वनडे सामना इंदोरला 24 जानेवारी रोजी होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भारत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT