Shreyas Iyer: मुंबईचा छोकरा बनला लगानमधील 'भूवन', या मिस्ट्री गर्लबरोबर केला डान्स; Video Viral

Shreyas Iyer Viral Video: भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याचे फोटो-व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर करतो.
Shreyas Iyer
Shreyas IyerDainik Gomantak
Published on
Updated on

Shreyas Iyer Viral Video: भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याचे फोटो-व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर करतो. आता त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो रस्टिक लूकमध्ये दिसत आहे. त्याने एक अभिनय देखील केला आहे, ज्यामध्ये तो एका मुलीसोबत दिसत आहे.

लगान-2 मध्ये अभिनय

श्रेयस अय्यरने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडिया स्टार रुही दोसानीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, श्रेयस अय्यर एकदम ग्रामीण शेतकऱ्याच्या लूकमध्ये दिसत आहे.

Shreyas Iyer
Shreyas Iyer किवींना नडतोच! न्यूझीलंडमध्ये भल्याभल्यांना न जमलेला केलाय पराक्रम

कोण आहे रुही

व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यरसोबत दिसणारी रुही दोसानी (Ruhi Dosani) डिजिटल क्रिएटर आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसोबत डान्स आणि अभिनय केला आहे. 25 वर्षीय रुहीचा जन्म अमेरिकेत झाला. नंतर ती भारतात आली. 2016 मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले. इन्स्टाग्रामवर तिचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती अनेक पंजाबी गायकांसोबतही दिसली आहे.

Shreyas Iyer
ICC Rankings: श्रेयस अय्यर अन् शुबमन गिलला लागली लॉटरी, ICC क्रमवारीत मोठा फायदा

श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या क्रिकेट क्षेत्रापासून दूर आहे. तो पुढील वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भाग घेणार आहे. त्याला टी-20 मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याकडे टी-20 संघाची कमान सोपवण्यात आली आहे तर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 3-3 वनडे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, जी 3 जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com