Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: 3 फॉरमॅटसाठी 3 कॅप्टन! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी BCCI ने केली भारतीय संघाची घोषणा

Team India Squad Announcement: BCCI ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या तीन फॉरमॅटच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

Manish Jadhav

Team India Squad Announcement: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या तीन फॉरमॅटच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला व्हाईट बॉल क्रिकेटमधून विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा कर्णधार असेल, तर वनडे संघाची कमान केएल राहुलकडे असेल. मात्र, कसोटी संघाचा कर्णधार खुद्द रोहित शर्मा असणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावांचा समावेश आहे, जे कसोटी संघाचा भाग नाहीत. ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांना कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरु होत आहे. हा दौरा 3 सामन्यांच्या T20 मालिकेनंतर सुरु होईल. त्यानंतर जानेवारीपर्यंत समान सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळवले जातील. साई सुदर्शनला वनडे संघात संधी मिळाली आहे, तर संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. सूर्यकुमार यादवला वनडे आणि कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. वनडे संघात रजत पाटीदार आणि रिंकू यांचीही नावे आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठी संघात निवड झालेल्या तिलक वर्माला आपले स्थान निश्चित करण्यात यश आले आहे.

3 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

3 वनडेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.

2 कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज , मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिद्ध कृष्णा.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

10 डिसेंबर पहिला T20, डर्बन

12 डिसेंबर, दुसरा T20, पोर्ट एलिझाबेथ

14 डिसेंबर, तिसरा T20, जोहान्सबर्ग

17 डिसेंबर, पहिली वनडे, जोहान्सबर्ग

19 डिसेंबर, दुसरी वनडे, पोर्ट एलिझाबेथ

21 डिसेंबर, तिसरी वनडे, पार्ल

26 ते 30 डिसेंबर, पहिली कसोटी, सेंच्युरियन

3 ते 7 जानेवारी, दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT