Team India Announced: रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणार्या टी-20 मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये परतणार असल्याची चर्चा होती. या टी-20 मालिकेसाठी सिलेक्टर्स संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची निवड करतील असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात होता, पण जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने गुरुवारी रात्री संघाची घोषणा केली, तेव्हा टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी त्यांची निवड झाली नाही. चला तर मग जाणून घ्या यामागचे खरे कारण, जे बीसीसीआयनेच सांगितले आहे.
दरम्यान, बीसीसीआयने एक प्रेस रिलीज जारी करुन संघाची घोषणा केली. यामध्ये बोर्डाने सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ब्रेक मागितला होता. बीसीसीआयने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना व्हाईट बॉल क्रिकेटसाठी विश्रांती देण्यात आली. त्यामुळे रोहित आणि विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थेट कसोटी मालिका खेळणार आहेत. रोहित शर्मा रेड बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे, तर सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर केएल राहुलकडे या दौऱ्यावर एकदिवसीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
मात्र, बीसीसीआय टी-20 विश्वचषक 2024 साठी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवणार असल्याचे समोर आले आहे. सिलेक्टर्संनी रोहित शर्माला कर्णधार म्हणून स्वीकारले असून अनुभवी फलंदाज म्हणून विराट कोहलीचाही संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही खेळाडूंना जानेवारीमध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसह या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. हे तीन सामने वेस्ट इंडिज आणि यूएसए मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारताचे शेवटचे T20 आंतरराष्ट्रीय सामने असतील. तथापि, जर विश्वचषकासाठी संघ निवडला गेला तर आयपीएल 2024 च्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होईल, कारण आयपीएलनंतरच टी -20 विश्वचषक आयोजित केला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.