AUS vs ZIM Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs ZIM: क्रिकेटचा नवा 'जायंट किलर'! झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवले; विश्वचषकात मोठा उलटफेर VIDEO

Zimbabwe vs Australia T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 19व्या साखळी सामन्यात क्रिकेट जगताला हादरवणारा एक मोठा निकाल समोर आला.

Manish Jadhav

Zimbabwe Beat Australia 23 Runs: टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 19व्या साखळी सामन्यात क्रिकेट जगताला हादरवणारा एक मोठा निकाल समोर आला. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या लढतीत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार उपलब्ध नसल्याने ट्रॅव्हिस हेड संघाचे नेतृत्व करत होता. हेडने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सुरुवातीला योग्य वाटला. मात्र, झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात तदिवानाशे मारुमानी आणि ब्रायन बेनेट या जोडीने अत्यंत संयमित पण आक्रमक पद्धतीने केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी करत भक्कम पाया रचला. मात्र मारुमानी 21 चेंडूत 35 धावा काढून बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या रेयान बर्लने ब्रायन बेनेटला उत्तम साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला (Australia) बॅकफूटवर ढकलले.

बर्ल 30 चेंडूत 35 धावा काढून बाद झाल्यानंतर कर्णधार सिकंदर रझाने मैदानात येऊन डावाला वेग दिला. रझाने केवळ 13 चेंडूत 25 धावांची फटकेबाजी केली. दुसरीकडे, ब्रायन बेनेटने एका टोकाकडून आपली खेळी सजवत 56 चेंडूत 64 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या संयमी खेळीमुळे झिम्बाब्वेने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 169 धावांचा आव्हानात्मक टप्पा गाठला.

170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था अत्यंत दयनीय झाली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर मारा करत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. केवळ 29 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 4 प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. जोश इंग्लिस, कर्णधार ट्रॅव्हिस हेड, कॅमेरुन ग्रीन आणि टिम डेव्हिड हे स्वस्तात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियावर पराभवाचे सावट निर्माण झाले. ग्रीन आणि डेव्हिड यांना तर आपले खातेही उघडता आले नाही.

खराब सुरुवातीनंतर अनुभवी ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 77 धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, मॅक्सवेल 32 चेंडूत 31 धावांची संथ खेळी खेळून बाद झाला आणि तिथून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाची घसरण सुरु झाली. मॅट रेनशॉने एका बाजूने किल्ला लढवत 44 चेंडूत 65 धावांची झुंजार खेळी खेळली, परंतु त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. शेवटच्या षटकांमध्ये झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी कमालीचे नियंत्रण राखले आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 19.3 ओव्हरमध्ये 146 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेचा (Zimbabwe) हा विजय टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या उलटफेरांपैकी एक मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

VIDEO: तरुणीला मागे बसवून झिगझॅग स्टाइलमध्ये चालवली बाइक; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT