Harry Brook Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

IND vs ENG T20 World Cup 2026 Semifinal: टी-20 वर्ल्ड कपच्या हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत.

Manish Jadhav

Harry Brook Warns Team India: टी-20 वर्ल्ड कपच्या हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा स्टार फलंदाज आणि कर्णधार हॅरी ब्रूकने भारतीय संघाला उद्देशून एक कडक मेसेज दिला. ब्रूकने स्पष्ट केले की, त्यांच्या संघाला 'हाय-प्रेशर' म्हणजेच अतिशय दडपणाच्या परिस्थितीत खेळायला अधिक आवडते आणि त्यांचा संघ अशा आव्हानांसाठी सज्ज आहे. ज्या वेळी विजयाची शक्यता कमी असते आणि सामन्यात मोठी जोखीम असते, तेव्हा इंग्लंडचा संघ आपली खरी हिंमत दाखवतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

इंग्लंडचा (England) या विश्वचषकातील आतापर्यंतचा प्रवास सोपा राहिलेला नाही. ग्रुप स्टेजमध्ये त्यांना नेपाळ, स्कॉटलंड आणि इटली यांसारख्या संघांविरुद्ध विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला, तर वेस्ट इंडिजकडून त्यांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. मात्र, सुपर-8 फेरीत इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केले.

श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले. विशेषतः न्यूझीलंडविरुद्धचा सामना अतिशय नाट्यमय झाला, जिथे इंग्लंडने शेवटच्या 3 षटकांत 43 धावा कुटून विजय खेचून आणला. या विजयांमुळेच संघाचे मनोबल उंचावले असून आम्ही कधीही खेळाच्या बाहेर नसतो, हे आम्ही सिद्ध केले, असे ब्रूक म्हणाला.

ब्रूकने इंग्लंडच्या आक्रमक दृष्टिकोनावर भर देताना सांगितले की, त्याच्या संघात जिद्दी खेळाडू आहेत जे शेवटपर्यंत हार मानत नाहीत. प्रतिस्पर्धी संघाला मैदानावर अस्वस्थ करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. जॉस बटलरची सध्याची संथ खेळी आणि फिल सॉल्टचे सातत्य नसणे यावर भाष्य करताना ब्रूकने आपल्या फलंदाजी युनिटवर पूर्ण विश्वास दाखवला. तो म्हणाला, "जॉस बटलर हा महान खेळाडू असून त्याला त्याच्या पद्धतीने खेळू दिले पाहिजे. आमच्या टॉप 7 मध्ये इतके स्फोटक फलंदाज आहेत की, त्यातील एखादा जरी चमकला तरी प्रतिस्पर्धी संघाची डोकेदुखी वाढते." तसेच त्याने विल जॅक्सच्या कामगिरीचेही कौतुक केले.

भारतासारख्या (India) बलाढ्य संघाविरुद्ध आणि भारतीय चाहत्यांच्या प्रचंड गदारोळात खेळणे हे एक मोठे आव्हान असल्याचे ब्रूकने मान्य केले. मैदानावर खूप मोठा आवाज आणि दोन्ही संघांवर प्रचंड दबाव असेल, पण अशाच वातावरणात इंग्लंडचा संघ आपला सर्वोत्तम खेळ खेळतो. भारताचा विजयी रथ रोखून फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज असून, उलटफेर करण्याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. या विधानामुळे सेमीफायनलपूर्वी मैदानावरील वातावरण अधिकच तापले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT