Babar Azam React On IND VS PAK Big Clash Dainik Gomantak
क्रीडा

India vs Pakistan: "टीम इंडियाविरूध्द शांत राहणंच फायद्याचं"; हायव्होल्टेज सामन्याआधी बाबर आझम थंडावला Watch Video

Babar Azam React On IND VS PAK Big Clash: टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठा थरार उद्या, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात मोठा थरार उद्या, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये मानसिक ओढाताण सुरू असतानाच, पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या मोठ्या सामन्यांमध्ये यश मिळवण्यासाठी तांत्रिक कौशल्यापेक्षा 'मानसिक शांतता' कशी महत्त्वाची ठरते, यावर बाबरने प्रकाश टाकला आहे.

बाबरचा कानमंत्र: 'बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा'

इएसपीएनक्रिकइन्फोने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये बाबर आझमने भारत-पाक सामन्याच्या दबावावर भाष्य केले. तो म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच उच्च तीव्रतेचा असतो. केवळ दोन देशच नव्हे, तर संपूर्ण जगाचे डोळे या सामन्यावर असतात. अशा वेळी खेळाडूंनी स्वतःला जितके शांत आणि रिलॅक्स ठेवता येईल, तितके चांगले. बाहेर काय चर्चा सुरू आहे, याकडे दुर्लक्ष करून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केल्यास मैदानात कामगिरी सुधारते." त्याने आपला अनुभव सांगताना स्पष्ट केले की, तो आपल्या युवा सहकाऱ्यांनाही तणावमुक्त राहण्याचा सल्ला देतो.

भारताविरुद्ध बाबरची कामगिरी

बाबर आझम शांत राहण्याचा सल्ला देत असला, तरी मैदानातील त्याची आकडेवारी त्याच्यासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. टीम इंडियाविरुद्ध बाबरने आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने केवळ १०५ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २६.२५ आणि स्ट्राईक रेट १२८ राहिला आहे. एकदा तर तो शून्यावरही बाद झाला आहे. या मोठ्या सामन्यात पाकिस्तानला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

संघातून डच्चू मिळणार?

२०२६ च्या विश्वचषकात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांत बाबरच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. त्याच्या खराब फॉर्ममुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यासारख्या महत्त्वाच्या लढतीत पाकिस्तान संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते.

बाबर आझमला अंतिम अकरा (Playing XI) मधून बाहेर बसवून त्याच्या जागी आक्रमक फलंदाज फखर जमानला सलामीला (Opening) संधी दिली जाण्याची शक्यता आहे. बाबर आझमच्या कर्णधारपदावर आणि स्थानावर निर्माण झालेली ही टांगती तलवार उद्याच्या सामन्यात काय वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनिदेवाच्या कृपेने पालटणार भाग्य; वैशाखच्या पहिल्या शनिवारी 'या' 4 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार प्रचंड यश

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT