Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard Kills Calf in Camurlim: उत्तर गोव्यातील कामुर्ली गावात बुधवारी मध्यरात्री एका बिबट्याने वासराची शिकार केल्याची घटना समोर आली आहे.

कामुर्ली: उत्तर गोव्यातील कामुर्ली गावात बुधवारी मध्यरात्री एका बिबट्याने वासराची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून, मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थ स्वतःच्या आणि आपल्या पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत.

अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा बिबट्याने एका स्थानिक रहिवाशाच्या गोठ्यात शिरून वासराला लक्ष्य केले. अंधाराचा फायदा घेत या हिंस्र प्राण्याने वासराचा फडशा पाडला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. "हा केवळ पाळीव प्राण्यांच्या नुकसानीचा विषय नाही, तर आता रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे," अशी भीती एका स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com