Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Iran Attack on Kuwait Desalination Plant: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या भीषण युद्धाचा फटका आता आखाती देशांमधील नागरी सुविधांना बसू लागला आहे.
Iran Attack on Kuwait Desalination Plant
Iran Attack on Kuwait Desalination PlantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Iran Attack on Kuwait Desalination Plant: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या भीषण युद्धाचा फटका आता आखाती देशांमधील नागरी सुविधांना बसू लागला आहे. शुक्रवारी इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कुवेतचा एक महत्त्वपूर्ण 'डिसॅलिनेशन प्लांट' गंभीररित्या बाधित झाला. सकाळी तेल शुद्धीकरण रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यानंतर हा दुसरा मोठा हल्ला असल्याचे समोर आले असून, यामुळे कुवेतच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठे संकट ओढवले आहे.

कुवेत सरकारने या हल्ल्याची पुष्टी केली असली तरी, अद्याप झालेल्या नुकसानीचा सविस्तर तपशील जाहीर केलेला नाही. मात्र, या प्रकल्पामधील काही महत्त्वाच्या भागांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची दाट शक्यता आहे.

Iran Attack on Kuwait Desalination Plant
Iran US War: इराणच्या 'स्वदेशी' शक्तीपुढे सुपरपॉवरचा थरकाप! अमेरिकेचे 850 कोटींचे F-35 फायटर जमीनदोस्त; नव्या एअर-डिफेन्स सिस्टिमने दाखवली ताकद

आखाती देशांसाठी आणि इराणसाठी डिसॅलिनेशन प्रकल्प हेच पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. वाळवंटी प्रदेश असल्याने या तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर केले जाते. कुवेतच्या बाबतीत सांगायचे तर, देशातील सुमारे 90 टक्के पिण्याचे पाणी याच प्रकल्पांतून येते. युद्धाच्या सुरुवातीला इराणने अमेरिका (America) आणि इस्रायलवर आपल्या अशाच एका पाणी प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्याचाच सूड म्हणून आता इराणने आखाती देशांमधील या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या प्रकल्पांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. लष्करी तळांऐवजी थेट नागरी सुविधांवर होणारे हे हल्ले भविष्यात भीषण पाणीटंचाईला निमंत्रण देणारे ठरु शकतात.

Iran Attack on Kuwait Desalination Plant
US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

डिसॅलिनेशन प्रकल्पांवर होणारे हे हल्ले केवळ तांत्रिक नुकसान नसून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही कोणत्याही देशासाठी युद्धापेक्षाही मोठे संकट ठरु शकते. या युद्धाचा परिणाम केवळ पाण्यापुरताच मर्यादित नसून आता अन्नधान्याच्या किमतींवरही त्याचे सावट दिसू लागले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेतील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, अन्नाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

Iran Attack on Kuwait Desalination Plant
US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

संयुक्त राष्ट्रांनी (UN) अन्नधान्याच्या वाढत्या किमतींबाबत गंभीर इशारा दिला. मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा जागतिक स्तरावर खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या असून डिसेंबरनंतरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. 'एफएओ' फूड प्राईस इंडेक्सनुसार, गेल्या महिन्यात जागतिक व्यापारात खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये 2.4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. युद्धाची झळ आता केवळ रणमैदानापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती सामान्य माणसाच्या ताटापर्यंत आणि पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचली आहे, जे जागतिक शांततेसाठी अत्यंत धोक्याचे लक्षण मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Strait Of Hormuz Cargo Ship Accident
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
US Iran War Pentagon Audit Report 2026
Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com