T20 World Cup 2022 | Virendra Sehwag Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022 : 'या' खेळाडूच्या फलंदाजीमुळे वाढवली बाबर-रिझवानची चिंता; सेहवागने दिला इशारा

T20 World Cup 2022 : हारिसने पहिल्याच सामन्यात आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यावर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषक 2022 हा आतापर्यंतचा पाकिस्तानसाठी खूप वाईट ठरला आहे. संघासोबतच या विश्वचषकात दोन्ही सलामीवीरांनाही विशेष काही करता आलेले नाही. संघाचा कर्णधार बाबर आझमने या T20 विश्वचषकात आतापर्यंत 4 डावात केवळ 14 धावा केल्या आहेत.

T20 विश्वचषकात पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना झाला. त्या सामन्यात फखर जमानऐवजी मोहम्मद हरिसचा संघात समावेश करण्यात आला होता. हारिसने पहिल्याच सामन्यात आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यावर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली. (T20 World Cup 2022 )

बाबर-रिजवानला दिला इशारा

आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मोहम्मद हारिसने 11 चेंडूत 28 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. हारिसची झटपट फलंदाजी पाहून वीरेंद्र सेहवागने बाबर-रिझवानला इशारा देताना सांगितले की, "जर हारिसने आफ्रिकेविरुद्ध गेल्या सामन्यात जसा खेळ केला तसाच खेळ सुरू ठेवला, तर तो मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना क्रमवारीत उतरण्यास भाग पाडू शकतो."

पाकिस्तानची शानदार फलंदाजी

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानने 20 षटकांत 9 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. या डावात अष्टपैलू शादाब खानने 22 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याशिवाय इफ्तिखार अहमदने 35 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT