Rishabh Shetty Meets ABD: 'या' स्टार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने केले 'कांतारा'चे कौतूक

मिस्टर 360 डिग्री देखील पडला ऋषभ शेट्टीच्या प्रेमात
Kantara Movie
Kantara Movie Dainik Gomantak

Rishabh Shetty Meets ABD: अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) याच्या 'कांतारा' चित्रपटाची गेल्या काही दिवसात हवा निर्माण झाली आहे. चित्रपटाचे सर्वसामान्य प्रेक्षक, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, समिक्षकांकडून कौतूक होत आहे. त्यामुळे भारतासह जगभरात या चित्रपटाचा फॅनबेस वाढत चालला आहे. यातच आता दिग्गज क्रिकेटपटुची भर पडली आहे.

Kantara Movie
T20 WC: न्यूझीलंडने मारली बाजी, T20 WC 2022 च्या उपांत्य फेरीत 'धडक'

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटमध्ये मिस्टर 360 डिग्री म्हणून परिचीत असलेल्या ए. बी. डिव्हिलियर्स (AB de Villiers) यानेही 'कांतारा'चे कौतूक केले आहे.

नुकतेच लेखक, दिग्दर्शक, अभिनेता ऋषभ शेट्टी याने ए. बी. डिव्हिलियर्सची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. आपापल्या क्षेत्रातील दिग्गज असलेल्या या सेलिब्रिटींनी काही वेळ एकत्र घालवला. या व्हिडिओमध्ये ए. बी. डिव्हिलियर्स हा 'कांतारा' हे चित्रपटाचे नाव मोठ्या उत्साहाने उच्चारताना दिसतो. यामुळे या चित्रपटाच्या प्रसिद्धीत आता आणखी भर पडली आहे.

Kantara Movie
Tabu Birthday Special : वयाच्या 52 व्या वर्षी तब्बू जगते लक्झरी लाइफ; नेट वर्थ जाणून व्हाल आश्चर्यचकित

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यात ऋषभने म्हटले आहे की, इट्स अ मॅच! मेट द रियल 360 टुडे. द सुपरहिरो इज बॅक टु द रूट्स अगेन टु नम्मा बेंगलुरू...

यापुर्वी अनिल कुंबळे, प्रभास, प्रशांत नील, विवेक रंजन अग्निहोत्री, रजनीकांत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, यांनी हा चित्रपट पाहून त्याचे कौतूक केले आहे. आयएमडीबीने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या सध्याच्या टॉप 250 भारतीय चित्रपटांमध्ये हा चित्रपट अव्वल स्थानी आहे. हा चित्रपट मूळ कन्नड भाषेत 30 सप्टेंबर रोजी रीलीज झाला होता त्यानंतर हिंदी भाषेत 14 ऑक्टोबर रोजी रीलीज झाला. चित्रपटात सप्तमी गौडा, किशोर कुमार जी. यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com