T20 World Cup: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने T20 विश्वचषकाच्या इतिहासात एक 'विराट विक्रम' केला आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराटने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. यासह विराट T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला.
दरम्यान, वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा (Chris Gayle) विक्रम मोडीत काढत विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे. विराट जेव्हा मैदानात येतो तेव्हा त्याच्या अप्रतिम पराक्रमाने मोठे विक्रम बनतात आणि मोडतात. विराट कोहली (Virat Kohli) सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.
कोहलीने हा 'विराट' विक्रम टी-20 विश्वचषकात आपल्या नावावर केला
विराट कोहली नेदरलँड्सविरुद्ध (Netherlands) नाबाद 62 धावा करुन T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात विराट कोहलीच्या नावावर आता 989 धावांची नोंद झाली आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. महेला जयवर्धनेने T20 विश्वचषकाच्या इतिहासात 1016 धावा केल्या आहेत.
कोहलीने गेलचा विक्रम मोडला
विराट कोहलीने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता ख्रिस गेलला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडिजचा (West Indies) दिग्गज ख्रिस गेल 965 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
1. महेला जयवर्धने (श्रीलंका) - 1016 धावा
2. विराट कोहली (भारत) - 989 धावा
3. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 965 धावा
एकूण टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 463 सामन्यात 14562 धावा
2. किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) - 614 सामन्यात 11915 धावा
3. शोएब मलिक (पाकिस्तान) - 481 सामन्यात 11902 धावा
4. विराट कोहली (भारत) - 355 सामन्यात 11174 धावा
5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 334 सामन्यात 11052 धावा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.