Ind vs Pak T20 World Cup: टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट; थरारक सामन्यात पाकिस्तानवर शेवटच्या चेंडुवर मात

कोहलीची नाबाद 'विराट' खेळी; विराट-हार्दिकची भागीदारी ठरली निर्णायक
Ind vs Pak T20 World Cup:
Ind vs Pak T20 World Cup:Dainik Gomantak
Published on
Updated on

Ind vs Pak T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या थरारक सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करत भारतीयांना दिवाळीची भेट दिली. तसेच गत विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा बदलाही घेतला. विराट कोहलीने 53 चेंडुत केलेल्या धडाकेबाज नाबाद 83 धावांची खेळी निर्णायक ठरली.

Ind vs Pak T20 World Cup:
Viral Video : अरे देवा! हत्तीलाही घरी जाण्याची घाई? थेट बसमध्येच चढण्याचा प्रयत्न; पुढे काय झालं पाहाच एकदा

अखेरच्या 8 चेंडुत 28 धावांची गरज असताना १९ व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडुंवर विराटने षटकार ठोकले. त्यामुळे अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. नवाजने टाकलेल्या अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडुवर मोठा फटका खेळण्याच्या नादात हार्दिक पंड्या झेलबाद झाला. त्याच्याजागी आलेल्या दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडुवर एक धाव घेतली. 4 चेंडुत 15 धावा असे समीकरण असताना विराट कोहलीकडे स्ट्राईक होता. तिसऱ्या चेंडुवर विराटने दोन धावा घेतल्या.

चौथ्या फुलटॉस चेंडुवर विराटने षटकार ठोकला. हा चेंडू नो बॉल ठरवला गेला. त्यामुळे आवश्यक धावांचे समीकरण 3 चेंडुत 6 धावा असे झाले. त्यानंतरचा चेंडु नवाझने वाईड टाकला. त्यानंतरच्या चेंडुवर तीन धावा पळून काढल्याने भारताच्या विजयासाठी दोन चेंडून दोन धावा असे समीकरण झाले. यावेळी नवाझच्या पाचव्या चेंडुवर दिनेश कार्तिक यष्टीचित झाल्याने भारतासाठी एका चेंडुत विजयासाठी दोन धावा असे समीकरण झाले. त्यानंतरचा चेंडु आर. आश्विनने हुशारीने वाईड सोडला. त्यानंतरचा चेंडु टोलवून आश्विनने भारताच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले.

हार्दिक पंड्याने 37 चेंडुत 40 धावा करत विराटला उत्तम साथ दिली होती. पाकिस्तानच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी 4 धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.

रोहित - राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवला 10 चेंडूत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले. भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुऱ्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र तो 2 धावा करून बाद झाला. भारताच्या 31 धावात 4 विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीने डाव सावरला. त्यांनी नवाझच्या एका षटकात तीन षटकार मारत धावगती वाढवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

Ind vs Pak T20 World Cup:
T20 World Cup: या 5 भारतीय खेळाडूंनी T20 विश्वचषकात मारले सर्वाधिक षटकार, वाचा

तत्पुर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावात रोखले. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून शान मसूद (52) आणि इफ्तिकार अहमदने (51) अर्धशतकी खेळी केली.

अवघ्या 15 धावात पाकिस्तानने दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर शान मसूद आणि इफ्तिकार अहमदने पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरूवात केली. या दोघांनी 9 व्या षटकात पाकिस्तानचे अर्धशतक धावफलकावर लावले. अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पाठोपाठ आघाडीचा फलंदाज मोहम्मद रिझवानला देखील बाद करत दुसरी मोठी शिकार केली. भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्या आणि आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबर आझमला शुन्यावर बाद केले. अर्शदीप सिंगने आसिफ अलीला आउट करत पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. मोहम्मद नवाजला हार्दिक पांड्याने बाद केले. नवाजने 9 धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या सध्या सहा गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा आहे.

14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने शादाब खानला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. शादाबला सहा चेंडूंत पाच धावा करता आल्या. त्याचवेळी शेवटच्या चेंडूवर हार्दिकने हैदर अलीला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. 14 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या पाच बाद 98 होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com