T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी काही फोटो व्हायरल होत आहेत. मात्र या फोटोंनी भारतीय चाहत्यांना घाबरवले आहे. वास्तविक, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात त्याने गुडघ्यावर आइस पॅक बांधला आहे.
ऋषभ पंत जखमी?
ऋषभ पंतचा (Rishabh Pant) हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, सोमवारी, जेव्हा भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टी-20 विश्वचषक सराव सामना खेळत होता, तेव्हा ऋषभ पंत गुडघ्यावर आइस पॅक बांधून डगआउटमध्ये बसलेला दिसला.
बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही
ऋषभ पंतच्या या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून (BCCI) कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु कोणताही फिट खेळाडू अशा प्रकारे आईस पॅक घेऊन बसणार नाही हे निश्चित आहे. प्रत्यक्षात ऋषभ पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली तर तो टीम इंडियासाठी (Team India) मोठा धक्का ठरु शकतो.
ऋषभ पंत दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर जाऊ शकतो?
ऋषभ पंत सोमवारी ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातून बाहेर होता, ज्याचे कारण त्याची दुखापत असल्याचे मानले जात आहे. ऋषभ पंत दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. मात्र, प्रत्येकाला बीसीसीआयच्या अपडेटची वाट पाहावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.