Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या दिग्गजाचे स्थान निश्चित, भारत स्वबळावर जिंकणार!

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या मोठ्या सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा आता पूर्णपणे निश्चित मानली जात आहे.

या भारतीय दिग्गजाची जागा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ठरली

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात (Australia) असून टी-20 विश्वचषकासाठी जोरदार तयारी करत आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन केएल राहुल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा (Team India) फलंदाज केएल राहुलने 74 धावांची शानदार खेळी केली.

पाकिस्तानसाठी वाईट बातमी

केएल राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी खूप चांगली बातमी आहे, मात्र पाकिस्तानसाठी खूप वाईट बातमी आहे. जर केएल राहुल 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उतरला तर त्याला रोखणे कठीण आहे. केएल राहुल हा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षाही धोकादायक फलंदाज आहे. केएल राहुलला हलक्यात घेण्याची चूक पाकिस्तान संघ करणार नाही.

शानदार फॉर्म

केएल राहुल (KL Rahul) तूफान फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. केएल राहुल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा सर्वात मोठा सामना विजेता ठरु शकतो. जेव्हा जेव्हा भारताला धावांची गरज असते तेव्हा-तेव्हा केएल राहुल शानदार खेळी करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT