T20 World Cup: BCCI ची मोठी घोषणा, बुमराह ऐवजी या घातक गोलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री

Indian Team: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
jasprit bumrah
jasprit bumrahDainik Gomantak
Published on
Updated on

Jasprit Bumrah Replacement In T20 World Cup 2022: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला. त्यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला. मात्र, आता त्याच्या जागी बीसीसीआयने एका घातक गोलंदाजाला संधी दिली आहे. हा खेळाडू काही चेंडूंमध्ये सामन्याचा चेहरा-मोहरा बदलतो. ऑस्ट्रेलियात हा गोलंदाज कर्णधार रोहित शर्माचे मोठे हत्यार ठरु शकतो.

या गोलंदाजाचा समावेश

बीसीसीआयने जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद शमीला भारतीय संघात संधी दिली आहे. शमी त्याच्या किलर बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे तो टीम इंडियासाठी फायदेशीर ठरु शकतो.

jasprit bumrah
T20 World Cup: या 5 भारतीय फलंदाजांनी T20 World Cup मध्ये केल्या सर्वाधिक धावा

धोकादायक गोलंदाजी

मोहम्मद शमी (Mohammed Shami) डावाच्या सुरुवातीला अत्यंत किलर गोलंदाजी करतो. त्याच्याकडे ती कला आहे की, तो कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेऊ शकतो. आशिया कपमध्ये डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे टीम इंडियाला (Team India) अडचणीचा सामना करावा लागला होता. तर शमी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यात निष्णात खेळाडू आहे.

jasprit bumrah
T20 World Cup: या 5 भारतीय फलंदाजांनी T20 World Cup मध्ये केल्या सर्वाधिक धावा

टीम इंडियाने अनेक सामने जिंकले

मोहम्मद शमीने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. T20 क्रिकेटमध्ये त्याची चार षटके पराभव आणि विजयातील फरक ठरवतात. स्विंग आणि रिव्हर्स स्विंगमध्ये तो उत्तम मास्टर आहे. त्याने टीम इंडियासाठी 17 टी-20 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. शमीने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना नामिबियाविरुद्ध खेळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com