T20 World Cup: India to face Pakistan on October 24 in Dubai
T20 World Cup: India to face Pakistan on October 24 in Dubai Twitter
क्रीडा

T20 World Cup: भारत पाकिस्तान सामना २४ ऑक्टोबरला; वेळापत्रक जाहीर

Akshay Badwe

अखेर ठरलं. भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) एकमेकांशी येत्या 24 ऑक्टोबर रोजी दुबईत (Dubai) भिडतील. टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) हे प्रतिस्पर्धी संघ एकाच गटात आले आहेत.

ICC ने मंगळवारी ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर केले.

Schedule of ICC T20 World Cup
Schedule of T20 World Cup

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही लढत एक हायव्होटेज असणार यात शंका नाही.

टी20 वर्ल्ड कपची सुरुवात येत्या 17 ऑक्टोबरपासून UAE मध्ये होईल. 2019 मध्ये आयसीसीच्या वन डे विश्वचषकात भारत- पाकिस्तान संघात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना पार पडला होता. या सामन्यात देखील भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. आता मात्र दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान टी-२० वर्ल्डकपसाठी एकमेकांसमोर येतील. आतापर्यंत झालेल्या 6 टी-२० वर्ल्डकप मध्ये फक्त दोन वेळा 2009 आणि 2010 मध्ये या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामने झाले नाहीत. 2007च्या टी-२० वर्ल्डकप मध्ये दोन्ही संघांत फायनलसह दोन लढती झाल्या होत्या. २०१२ मध्ये देखील सुपर-8 आणि 2014 व 2016 मध्ये ग्रुप स्टेज मध्ये या दोन्ही संघात सामने झाले होते.

दुसऱ्या बाजूला आयसीसीने या वर्षाच्या टी-२० वर्ल्डकपसाठीचे दोन ग्रुप आधीच जाहीर केले होते. ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत तर ग्रुप २ मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ आहेत.

फेरी 1 (पात्रता टप्पा):

गट अ: श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामिबिया

गट ब: बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान

सुपर 12s (अंतिम फेरी):

गट 1: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ए 1, बी 2

गट 2: भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, बी 1, ए 2

भारताचे सामने:

  • भारत विरुद्ध पाकिस्तान- 24ऑक्टोबर

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- 31ऑक्टोबर

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान- 3 नोव्हेंबर

  • भारत विरुद्ध ग्रुप B१- 5 नोव्हेंबर

  • भारत विरुद्ध ग्रुप A२- 8 नोव्हेंबर

वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये एक उत्साहचं वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT