अफगाणिस्तानच्या (Afghanistan) या पराभवामुळे तालिबानचा (Taliban) म्होरक्या अनास हक्कानी (Anas Haqqani) सुद्धा आश्चर्यचकित झाला आहे. Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: आफगाणिस्तानच्या पराभवानंतर तालिबानच्या अनास हक्कानी यांचे मोठे विधान

आफगाणिस्तानच्या (Afghanistan) पराभावानंतर तालिबानने (Taliban) त्यांच्या संघावर टीका केली नाही. तर त्यांचे खेळाडू अधिक खंबीरपणे मैदानात उतरले आणि त्यांनी युद्ध लढण्याची हिंमत दिली. असे हक्कानी म्हणाले.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: टी-२० विश्वचषकात (T-20 World Cup) पाकिस्तानने (Pakistan) काल अफगाणिस्तानचा (Afghanistan) 5 विकेट्सने पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र 19व्या षटकात आसिफ अलीने 4 षटकार मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या लाखो चाहत्यांची मने तुटली. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची सर्वांनाच अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. अफगाणिस्तानच्या या पराभवामुळे तालिबानचा (Taliban) म्होरक्या अनास हक्कानी (Anas Haqqani) सुद्धा आश्चर्यचकित झाला आहे. पण यात एक चांगली गोष्ट म्हणजे तालिबानने पराभवानंतर त्यांच्या संघावर टीका केली नाही. तर त्यांचे खेळाडू अधिक खंबीरपणे मैदानात उतरले. त्यांनी युद्ध लढण्याची हिंमत दिली.

जलालुद्दीन हक्कानी यांचा मुलगा अनास हक्कानी याने सामन्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या संघाला प्रोत्साहन दिले. मिर्झा अजीम बेग यांच्या कवितेचा संदर्भ देत त्यांनी लिहिले की, ‘गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में वो तिफ़्ल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले’. म्हणजेच मैदानात लढताना योद्धा कधी पडतो. पण त्यामुळे मुले चालणे थांबवित नाहीत.

तालिबान आणि क्रिकेट

अनास हक्कानी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अनेक मोठे खेळाडू त्याला फॉलो करतात. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत जवळपास 10 हजार लाईक्स मिळाले आहेत. हक्कानी नेटवर्क तालिबानचा सहयोगी आहे. या नेटवर्कवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वर्षी 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. तालिबानचा क्रिकेटला विरोध आहे. पण आता हळूहळू त्यांचा तो दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.

अफगाणिस्तानचा पराभव

दुबईत पाकिस्तानच्या शानदार गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानने पॉवरप्लेमध्ये चार विकेट्स गमावल्या. मात्र यानंतर कर्णधार मोहम्मद नबी आणि गुलबदिन नायब यांच्यात सातव्या विकेटसाठी 45 चेंडूत 71 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे अफगाणिस्तानने 6 बाद 147 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानने 18 व्या षटकात डावातील सर्वाधिक 21 धावा जोडल्या, ज्यामध्ये नायबने एक षटकार आणि दोन चौकार मारले. नायब (२५ चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार) आणि नबी (32 चेंडूत 5 चौकार) मारेल. या दोघांनी नाबाद 35 धावा केल्या. या दोघांच्या जोरावर अफगाणिस्तानने शेवटच्या तीन षटकांत 43 धावा जोडल्या.

उपांत्य फेरीच्या आशा

पॉईंट टेबल पाहता अफगाणिस्तानचा संघ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानला आता एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. अफगाणिस्तानला अजून तीन सामने खेळायचे आहेत. म्हणजेच उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT