आत्तापर्यंत 'हे' संघ ठरले ICC T-20 World Cupचे मानकरी

Sanket Kulkarni

T-20 विश्वचषकाला 2007 साली सुरुवात झाली. या पहिल्या विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी उचलण्याचा मान भारतीय संघाला मिळाला. भारताने ही स्पर्धा जिंकत एक इतिहास रचला आणि नव्या भारतीय संघाचा उदय झाला.

T-20 World Cup 2007 India Win | Dainik Gomantak

T-20 चा 2009 सालच्या विश्वचषकावर पाकिस्तानने पहिल्यांदाच आपला ठसा उटविला. पाकिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेला मात दिली.

T-20 World Cup 2009 Pakistan Win | Dainik Gomantak

T-20 चा 2010 सालची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडने आपल्यानावावर केली. त्यांनी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.

T-20 World Cup 2010 England Win | Dainik Gomantak

2012 मध्ये तकड्या वेस्ट इंडीज संघाने श्रीलंकेला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करुन T-20 विश्वचषकावर पहिल्यांदा आपले नाव कोरले.

T-20 World Cup 2012 West Indies Win | Dainik Gomantak

दोनवेळा अंतिम सामन्यात पराभावाचा सामना केल्यानंतर श्रीलंकेने अखेर 2014 साली T-20 विश्वचषकावर मोहोर उमटविली.

T-20 World Cup 2014 Sri Lanka Win | Dainik Gomantak

चॅम्पियन आणि पॉवर हिटर संघ अशी ओळख असलेल्या वेस्ट इंडीज 2016 मध्ये पुन्हा एकादा या विश्वचषकावर नाव कोरत We are the Champions हे दाखवून दिले.

T-20 World Cup 2016 West Indies Win | Dainik Gomantak

ICC T-20 World Cup 2020 ऑस्ट्रेलियात होणार होता परंतु करोना महामारीमुळे हा विश्वचषक पुढे ढकलण्यात आला, ही स्पर्धा आता 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळविण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेली ICC T-20 विश्वचषक स्पर्धा ही भारतात होणार होती, मात्र कोरोनाच्या वाढत्याप्रभावामुळे ही स्पर्धा भारतातून युएईमध्ये हलविण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC T-20 World Cup 2021 | Dainik Gomantak