Pakistani Former Cricketer Waqar Younis Dainik Gomantak
क्रीडा

...अखेर वकार युनूसला केलेल्या चुकीवर मागावी लागली माफी

वकारच्या विधानावर प्रसिद्ध निवेदक हर्षा भोगले यांनीही व्यक्त केली होती निराशा

Siddhesh Shirsat

T-20 World Cup 2021: पाकिस्तान आणि भारत यांच्यातील टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील (ODI World Cup) पहिल्या 12 सामन्यांमध्ये फक्त भारताचाच विजय झाला होता. पण आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 (ICC T-20 World Cup 2021) मध्ये हा इतिहास बदलला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव करत या मोठ्या ICC स्पर्धेत पहिला विजय मिळवला, या विजयानंतर संपूर्ण पाकिस्तानात उत्सवाचे वातावरण होते. या आनंदी वातावरणात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस (Cricketer Waqar Younis) एका टीव्ही चॅनलवर असे काही बोलला की, त्याच्यावर जोरदार टीका झाली, टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर वकारला आपण काहीतरी चुकीचे बोलल्याचे कळून चुकले.

त्यामुळे आता त्याने माफी मागितली आहे. वकारने जे विधान केले होते ते मोहम्मद रिझवानबद्दल होते, भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान रिजवानने ड्रिंक्सच्या वेळी नमाज अदा केली होती. यासाठी सामना जिंकल्यानंतर वकारने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला, 'मला रिजवानची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याने जमिनीवर उभे राहून नमाज अदा केली, ती माझ्यासाठी हिंदूंमध्ये खूप खास होती, हे विधान समोर आल्यानंतर वकारवर हल्ले सुरू झाले, आता त्यांनी यावर ट्वीट करून माफी मागितली आहे.

माझा हा हेतू नव्हता: वकार

वकारने ट्वीट करताना माफीनाम्यात म्हटले आहे की, मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत, त्यावेळच्या वातावरणात मी असे काही बोललो ज्यावर माझा विश्वास बसत नाही, त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या याबद्दल मी माफी मागतो. माझा तसा हेतू नव्हता. मी एक चूक केली, खेळ लोकांना जात, धर्म इत्यादींचा विचार न करता एकत्र आणतात.

असे हर्षा भोगले यांनी सांगितले होते

वकारचे हे वक्तव्य आल्यानंतर त्याच्यावर चौफेर हल्ला झाला. त्यात प्रसिद्ध निवेदक हर्षा भोगले यांच्या नावाचाही समावेश आहे. हर्षाने ट्वीट करून वकारच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याने लिहिले की, हिंदूसमोर रिझवानची प्रार्थना वकार युनूससारख्या विक्रमी खेळाडूसाठी एक खास क्षण होता, मी ऐकलेल्या सर्वात निराशाजनक गोष्टींपैकी एक आहे, आपल्यापैकी बरेच जण अशा गोष्टी दडपण्याचा आणि खेळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. खेळाच्या ठिकाणी अश्या गोष्टी ऐकणे निराशाजनक वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

IAF Dinner Menu: रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान; भारतीय वायुसेनेचा मेनू व्हायरल, पाकच्या उद्धवस्त एअरबेसची नावे पदार्थांना दिली

Goa Live News: मोरजाई देवस्थान वादात हायकोर्टाचा कठोर इशारा; '13 ऑक्टोबरपर्यंत सर्व रेकॉर्ड्स द्या, अन्यथा FIR दाखल करु'

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT