पाकिस्तानी खेळाडूने हरभजन सिंगला डिवचलं,भज्जीचंही जोरदार प्रत्युत्तर

हरभजन सिंग आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरचं आहे. मंगळवारी या दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद उडालेला पाहायला मिळाला.
Harbhajan Singh & Mohammad Amir battle on twitter after INDvsPak
Harbhajan Singh & Mohammad Amir battle on twitter after INDvsPak Dainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2021 मध्ये, भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी संपला, परंतु मैदानाबाहेरची लढाई अजूनही सुरूच आहे . सोशल मीडियावर एकमेकांशी भांडणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंमधील ही लढाई असून ताजं प्रकरण हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरचं (Mohammad Amir) आहे. मंगळवारी या दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक वाद उडालेला पाहायला मिळाला. (Harbhajan Singh & Mohammad Amir battle on twitter after INDvsPak)

या वादाला तोंड फुटलं ते मोहम्मद आमिरने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरून. आमिरने शाहिद आफ्रिदीचा व्हिडिओ पोस्ट करून हरभजन सिंगला डिवचले त्यानंतर भज्जीनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत 'लॉर्ड्स' कसोटीतील नो बॉलबद्दल विचारले.

हा वाद म्हणजे मोहम्मद आमिरने शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे . आफ्रिदीने हरभजन सिंगच्या षटकात सलग 4 षटकार मारले होते . त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. आमिरने हा व्हिडिओ ट्विट करत , 'मी थोडा व्यस्त होतो हरभजन सिंग .मि लालाने तुला ४ चेंडूत ४ षटकार ठोकले तेव्हाची तुझी गोलंदाजी पाहत होतो. एकदिवसीय सामन्यात ठीक पण कसोटी क्रिकेटमध्ये ते जरा जास्तच झाले आहे.' हरभजनला डिवचलं.

पण आपला भज्जी तो भज्जीच त्यानेही याला जोरदार उत्तर दिलं

हरभजन सिंगने आपल्या ट्विटमध्ये आमिरला चक्क फिक्सिंग प्रकरणावरच प्रश्न विचारला. त्याने लिहिले, 'लॉर्ड्सवर नो बॉल कसा झाला? कोणी किती घेतले? कसोटी क्रिकेटमध्ये नो बॉल असूच शकत नाही. लाज वाटते तुमची आणि तुमच्या समर्थकांची देखील ज्यांनी अशा सुंदर खेळाचा अपमान केला आहे.'28 ऑगस्ट 2010 रोजी इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत मोहम्मद आमिर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट यांनी फिक्सिंग केले होते. त्यामुळे तिन्ही खेळाडूंवरही बंदी घालण्यात आली होती. या तिन्ही खेळाडूंना या प्रकरणी तुरुंगाची हवाही खावी लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com