Goa Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा संघ लखनौला रवाना

कृष्णन भास्कर पिल्लई (Krishnan Bhaskar Pillai) यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याचा वीस सदस्यीय संघ बुधवारी लखनौला रवाना होईल.

किशोर पेटकर

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक (Syed Mushtaq Ali Trophy) ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत एलिट अ गटात गोव्याला चांगल्या सुरवातीची संधी लाभू शकते. कृष्णन भास्कर पिल्लई (Krishnan Bhaskar Pillai) यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याचा वीस सदस्यीय संघ बुधवारी लखनौला रवाना होईल. स्पर्धेपूर्वी लखनौ (Lucknow) येथे विलगीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून स्पर्धेतील मोहिमेस सुरवात करेल. गतमोसमात खेळलेला मुंबईचा व्यावसायिक क्रिकेटपटू एकनाथ केरकर (Eknath Kerkar) याच्याकडे गोव्याचे नेतृत्व आहे.

गोव्याचा स्पर्धेतील पहिला सामना 4 नोव्हेंबरला ओडिशाविरुद्ध होईल, नंतर 5 नोव्हेंबरविरुद्ध पुदुचेरीविरुद्ध सामना होईल. प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करता, या दोन्ही संघांविरुद्ध गोव्याला विजयाचे संधी असेल. मात्र नंतरच्या तिन्ही लढतीत कस लागेल. पंजाबविरुद्ध 6 नोव्हेंबरला, तमिळनाडूविरुद्ध 8 नोव्हेंबरला, तर 9 नोव्हेंबरला महाराष्ट्राविरुद्ध लढत होईल.

गतमोसमात गोव्याने ट्वेन्टी-20 स्पर्धेत पाचपैकी तीन सामने जिंकले होते. इंदूर येथे झालेल्या स्पर्धेत पहिल्याच लढतीत मध्य प्रदेशने 215 धावांचे आव्हान दिल्यानंतर गोव्याने 208 धावांची मजल मारत फलंदाजीतील आक्रमकता प्रदर्शित केली होती. गतमोसमात गोव्याला गोलंदाजीत निराशा पत्करावी लागली होती. सौराष्ट्राने गोव्याची गोलंदाजी झोडपताना 215 धावा केल्या होत्या, त्यामुळे यावेळी गोलंदाजांकडून सुधारित कामगिरी अपेक्षित असेल. ऑफस्पिनर अमित यादव पदार्पण करत आहे, तसेच विदर्भाचा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघ व मुंबईचा शुभम रांजणे यांच्यामुळे गोलंदाजीस धार येण्याची अपेक्षा आहे.

गोव्याचा संघ

एकनाथ केरकर (कर्णधार), ईशान गडेकर, वैभव गोवेकर, आदित्य कौशिक, सुयश प्रभुदेसाई, स्नेहल कवठणकर, शुभम रांजणे, मोहित रेडकर, दीपराज गावकर, अमोघ देसाई, दर्शन मिसाळ, अमूल्य पांड्रेकर, अमित यादव, मलिकसाब शिरूर, समर दुभाषी, विजेश प्रभेसाई, फेलिक्स आलेमाव, निहाल सुर्लकर, श्रीकांत वाघ, लक्षय गर्ग.

आमची चांगली तयारी झालीय. खेळाडूंचा जम बसलाय. संघातील व्यावसायिक खेळाडूंनीही चांगला फॉर्म प्रदर्शित केलाय. सामना जिंकणे हीच संघाची मानसिकता आहे. आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.``

- के. भास्कर पिल्लई

गोवा क्रिकेट संघाचे प्रशिक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुंकळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

Goa Politics: खरी कुजबुज; कामत अन् तवडकर

Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

SCROLL FOR NEXT