Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: ICC क्रमवारीत पुन्हा सूर्याचा जलवा! पहिला क्रमांक राखला तोही विक्रमासहितचं

सूर्यकुमार यादवने आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांक कायम राखत मोठा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

ICC T20I Ranking: भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये आहे. तो गेल्यावर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. विशेषत: त्याची टी20 क्रिकेटमधील कामगिरी वाखाणण्याजोगी झाली आहे. त्याचेच बक्षीस म्हणून आता त्याने आयसीसी टी20 क्रमवारीत फलंदाजीमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पाँइंट्स मिळवले आहेत.

सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्ध रांचीमध्ये २७ जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या टी20 सामन्यांत 47 धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे तो आयसीसी टी20 क्रमवारीत 910 रेटिंग पाँइंट्सपर्यंत पोहोचला होता. यासह तो अव्वल क्रमांकावर कायम राहिला. 910 हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग पाँइंट्स ठरले आहेत.

मात्र, न्यूझीलंडविरुद्ध लखनऊला 29 जानेवारी रोजी झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने 26 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळे त्याचे रेटिंग पाँइंट्स घसरून पुन्हा 908 झाले आहेत. मात्र असे असले तरी तो अव्वल क्रमांकावर कायम आहे. तसेच त्याला 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यातून त्याचे रेटिंग पाँइंट्स पुन्हा वाढवण्याची संधी आहे.

तसेच त्याच्याकडे डेव्हिड मलानचा आयसीसी टी20 क्रमवारीत फलंदाजीमध्ये सर्वोत्तम रेटिंग पाँइंट्स मिळवण्याचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. सध्या टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजीत सर्वाकालिन सर्वोत्तम रेटिंग पाँइंट्स मिळण्याचा विक्रम मलानच्या नावावर आहे.

मलानने 2020 मध्ये 915 रेटिंग पाँइंट्स मिळवले होते. आत्तापर्यंत त्याच्याव्यतिरिक्त टी20 क्रिकेटमध्ये कोणालाही एवढे रेटिंग पाँइंट्स मिळवता आलेले नाही. टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजीत सर्वाकालिन सर्वोत्तम रेटिंग पाँइंट्स मिळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण आता पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची संधी सूर्यकुमारकडे आहे.

(Suryakumar Yadav top T20I batter reached a new career-high rating on the ICC Men's T20I Batting Rankings)

दरम्यान, सूर्यकुमारने काही दिवसांपूर्वीच आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटू 2022 पुरस्कार जिंकला आहे. त्याने गेल्यावर्षी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर सध्या आयसीसी टी20 क्रमवारीत सूर्यकुमार व्यतिरिक्त पहिल्या 10 फलंदाजांमध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सध्या सर्वोत्तम क्रमवारी विराट कोहलीची आहे. तो 14 व्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल केएल राहुल 25 आणि रोहित शर्मा 28 व्या क्रमांकावर आहेत.

तसेच सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलेनला क्रमवारीत फायदा झाला असून तो 8 स्थानांची झेप घेत 19 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच डॅरिल मिशेल 29 व्या क्रमांकावर आला आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटेनरने या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही दिलेल्या योगदानामुळे तो गोलंदाजी क्रमवारीत 9 व्या आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 23 व्या क्रमांकावर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

SCROLL FOR NEXT