SuryaKumar Yadav: टीम इंडियाच्या 'मिस्टर 360' ची सुपरहिट लव्ह स्टोरी, 5 वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ

SuryaKumar Yadav And Devisha Shetty: टीम इंडियाचा 'मिस्टर 360' म्हणजेच डॅशिंग बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या टीमचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
SuryaKumar Yadav And Devisha Shetty
SuryaKumar Yadav And Devisha ShettyDainik Gomantak

SuryaKumar Yadav And Devisha Shetty: टीम इंडियाचा 'मिस्टर 360' म्हणजेच डॅशिंग बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या टीमचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सूर्यकुमार यादवच्या क्रिकेट प्रवासासोबतच त्याची लव्ह लाईफही खूप मनोरंजक आहे. सूर्यकुमारच्या कॉलेज लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादवने 2016 मध्ये देविशा शेट्टीशी लग्न केले. देविशाचा जन्म 1993 मध्ये मुंबईत झाला. सूर्यकुमार आणि देविशा यांची पहिली भेट मुंबईच्या (Mumbai) पोद्दार कॉलेज ऑफ आर्ट्स कॉलेजमध्ये झाली. कॉलेजच्या एका कार्यक्रमात देविशाच्या डान्सने सूर्याला भुरळ घातली होती.

SuryaKumar Yadav And Devisha Shetty
Suryakumar Yadav: शतक झळकावूनही सूर्या होणार टीम इंडियातून बाहेर! हा खेळाडू...

तसेच, देविशा शेट्टीला कॉलेज जीवनापासूनच नृत्याची खूप आवड आहे. दोघांची प्रेमकहाणी डान्सच्या कार्यक्रमातूनच सुरु झाली. लग्नापूर्वी दोघांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केले. देविशाने 2013 ते 2015 या कालावधीत 'द लाइटहाउस प्रोजेक्ट' या एनजीओसाठी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. सामाजिक कार्यातही ती सक्रिय आहे.

SuryaKumar Yadav And Devisha Shetty
Suryakumar Yadav: 'सूर्या जर पाकिस्तानात असता तर...', पाकच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य

दुसरीकडे, देविशा शेट्टी अनेकदा सूर्यकुमार मैदानात साथ देताना दिसली आहे. विशेष म्हणजे, सूर्या आणि देविशा हे दोघेही इंस्टाग्रामवर सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात. सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) सध्या T20 क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 19 एकदिवसीय आणि 45 टी-20 सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com