India vs South Africa  BCCI
क्रीडा

IND vs SA: '...अन् तेव्हा विजय दूर गेला', सूर्यकुमारने सांगितले भारताच्या हातून कसा निसटला सामना

Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात झालेल्या पराभवाबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd T20I Match at Gqeberha, Suryakumar Yadav:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मंगळवारी टी२० मालिकेतील दुसरा सामना गेकेबेरा येथे झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

दरम्यान, या सामन्यात पराभूत झाल्यानंतर कुठे भारताच्या हातून विजय निसटला याबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 7 बाद 180 धावा केल्यानंतर पावसामुळे काही काळ सामना थांबला होता.

पुन्हा सामना सुरू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 13.5 षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.

या सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, 'दक्षिण आफ्रिकेने पहिले ५-६ षटके चांगली फलंजाजी केली होती, त्यामुळे आमच्यापासून सामना दूर गेला.'

तसेच सूर्यकुमारने म्हटले की मैदानात जाऊन स्वत:ला व्यक्त होणे महत्त्वाचे होते. तो म्हणाला, 'ओल्या चेंडूसह खेळणे कठीण होते, पण आम्हाला भविष्यातही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.'

दरम्यान, या सामन्याक रिझा हेड्रिंक्सने सलामीला महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने मॅथ्यू ब्रित्झकेला साथीला घेत पहिल्या तीन षटकात दक्षिण आफ्रिकेला ४० धावांचा टप्पा पार करुन दिला होता. मॅथ्यू 16 धावांवर धावबाद झाल्यानंतरही हेंड्रिक्स आणि कर्णधार एडेन मार्करमने अर्धशतकी भागीदारी केली आणि संघासाठी विजय सोपा केला.

हेड्रिक्सने 8 चौकार आणि 1 षटकारासह 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. तसेच मार्करमने 17 चेंडूत 30 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले आणि संघाचा विजय निश्चित केला.

भारताकडून गोलंदाजीत मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगने अर्धशतकी खेळी केल्या होत्या. सूर्यकुमारने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 36 चेंडूत 56 धावा केल्या. तसेच रिंकूने 39 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांची नाबाद खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन, लिझाड विल्यम्स, ताब्राईज शम्सी आणि एडेन मार्करम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Capital Gains Tax Removed: विदेशी गुंतवणूकदारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; सरकारी बॉन्ड्सवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द, अर्थव्यवस्थेला मिळणार बळ

दूषित अन्नामुळे दरवर्षी 86 कोटी लोक आजारी, 15 लाखांहून अधिक मृत्यू, लहान मुलांना 3 पट धोका; WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट

Vaidhriti Yog 2026: कुटुंबाची साथ सुटणार अन् बजेट कोलमडणार! जून महिन्यात 'डबल वैधृती योग'चा महाधोका; 5 राशींवर ओढवणार संकटांची मालिका

आयपीएल सट्टेबाजी ते दाऊदची धमकी... ललित मोदींच्या मुलाखतीने क्रिकेट जगतात खळबळ, केले अनेक मोठे खुलासे Watch Video

SAFF Championship: भारतीय महिला सहाव्यांदा अंतिम फेरीत, भूतानवर 1-0 फरकाने विजय; विजेतेपदासाठी गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान

SCROLL FOR NEXT