Suryakumar Yadav Batting: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. 2022 च्या T20 विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली. आता न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्याने तुफानी शतक झळकावून सर्वांची मने जिंकली. आता त्याने क्रिकेट जगताचा '360 डिग्री फलंदाज' एबी डिव्हिलियर्सबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे.
सूर्यकुमार यादव यांनी हे उत्तर दिले
चाहत्याने सूर्यकुमारला विचारले की, तु क्रिकेट जगतातील पुढचा मिस्टर 360 आहेस का? त्यावर तो म्हणाला की, जागतिक क्रिकेटमध्ये फक्त एकच मिस्टर 360 आहे आणि तो म्हणजे एबी डिव्हिलियर्स. ज्यांच्यासोबत चहलही खेळला आहे. मला त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली नाही, पण मी त्यांच्याशी बोललो आहे. ते कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे. मी फक्त माझ्या क्षमतेनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो आणि मला पुढचा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) व्हायचे आहे.'
असे कोहलीसाठी सांगितले
पुढे बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, 'जेव्हा लोक माझ्या खेळाबद्दल मेसेज किंवा ट्विट करतात तेव्हा खूप छान वाटतं, मी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सरांकडून दहा वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्ससाठी फ्रँचायझी क्रिकेट खेळलो, तेव्हा त्यांच्याकडून खूप काही शिकलो. आताही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. विराट कोहली भाई, आता आम्ही एकत्र खेळतो तेव्हा खूप छान वाटतं.'
तुम्ही मैदानावर जोखीम घेऊ शकत नाही
सूर्या पुढे असेही म्हणाला की, 'आधी म्हटल्याप्रमाणे मला या फॉरमॅटमध्ये सकारात्मक हेतूने खेळायचे आहे. मी फलंदाजी करण्यापूर्वी जास्त विचार करत नाही, कारण विचार करण्याची वेळ सराव सत्रात आणि हॉटेलच्या खोलीत असते. तुम्ही मैदानावर जास्त जोखीम पत्करु शकत नाही, तुम्हाला फक्त मैदानावर एन्जॉय करण्याची गरज आहे.'
सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये
सूर्यकुमार यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. जगातील अव्वल क्रमांकाचा टी-20 फलंदाज सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्ध 360-डिग्री शैलीचा वापर करत 51 चेंडूत 11 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 217.65 च्या स्ट्राइक रेटने 111 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.