Suryakumar Yadav
Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: मोहम्मद रिझवानची बादशाहत संपली, टी-20 क्रिकेटमध्ये सूर्याने गाठले हे स्थान

दैनिक गोमन्तक

Suryakumar Yadav Mohammad Rizwan: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे. आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार शैलीत पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. यानंतर टीम इंडियाने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. त्यामुळे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार बनली आहे. त्याचबरोबर भारताकडून सूर्यकुमार यादवने एक मोठा विक्रम केला असून त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. चला तर मग त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

सूर्यकुमार यादवने हा मोठा विक्रम केला

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चांगलाच फॉर्मात आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. नेदरलँड्सविरुद्ध त्याने अवघ्या 25 चेंडूंत 51 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. यासह तो 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) मागे सोडले आहे.

सूर्यकुमारने इतक्या धावा केल्या

भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवने या वर्षात म्हणजे 2022 मध्ये आतापर्यंत 25 सामन्यांमध्ये 41.28 च्या सरासरीने 867 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा (Pakistan) यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने यावर्षी 20 सामन्यांत 51.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकातील (T-20 World Cup) दोन्ही सामन्यांमध्ये रिझवान फ्लॉप ठरला आहे.

छोट्या कारकिर्दीत छाप पाडली

सूर्यकुमार यादवने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तो मैदानावर तुफान फटकेबाजी करतो. त्याला भारताचा 'एबी डिव्हिलियर्स' ही म्हणतात. त्याने भारतासाठी 36 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1111 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक झंझावाती शतकाची नोंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: ओल्ड गोवा येथे कारचा अपघात

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT