Suryakumar Yadav  Dainik Gomantak
क्रीडा

ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादव देतोय बाबर आझमला टक्कर

Team India: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ताज्या ICC T20 क्रमवारीत दोन स्थानांनी झेप घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

ICC T20 Rankings: टीम इंडियाचा स्टार फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमार यादवने ताज्या ICC T20 क्रमवारीत दोन स्थानांनी झेप घेतली आहे. सूर्यकुमारने 2 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 76 धावा केल्या होत्या. त्याचाच त्याला रँकिंगमध्ये फायदा झाला.

दरम्यान, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यातील अंतर आता फक्त दोन रेटिंग गुणांचे उरले आहे. बाबर आझम (Babar Azam) टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सूर्यकुमारने ताज्या क्रमवारीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामला मागे टाकले आहे.

दुसरीकडे, बाबर आझमचे 818 रेटिंग गुण आहेत, तर सूर्यकुमारचे 816 रेटिंग गुण आहेत. टॉप 10 टी-20 फलंदाजांमध्ये दुसरा कोणताही भारतीय नाही. इंग्लंडचा (England) डेव्हिड मलान पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

शिवाय, इशान किशन 14 व्या क्रमांकावर तर कर्णधार रोहित शर्मा 16 व्या क्रमांकावर कायम आहे. लोकेश राहुलचाही टॉप-20 फलंदाजांमध्ये समावेश आहे, जो 20 व्या स्थानावर कायम आहे. मात्र श्रेयस अय्यरला एक स्थान गमवावे लागले असून तो 24 व्या स्थानावरुन 25 व्या स्थानावर घसरला आहे.

त्याचबरोबर, विराट कोहलीही एका स्थानाच्या नुकसानासह 28 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवने अलिकडच्या काळात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. त्याचाच परिणाम त्याच्या क्रमवारीवरही दिसून आला. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांनंतर सूर्यकुमार यादव बाबर आझमलाही मागे टाकू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: कर्नाटकचे पितळ उघडे! खोट्या माहितीद्वारे घेतले जागतिक बँकेचे कर्ज! 'म्‍हादई'प्रश्‍नी गोवा सरकार देणार पुरावे

Mhaje Ghar: एक कार्यक्रम, 173 बैठका! ‘माझे घर’साठी भाजपने केले सूक्ष्म नियोजन; लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

SCROLL FOR NEXT