ICC T20 Rankings: शेफाली वर्मा पुन्हा नंबर वन, ऑस्ट्रेलियन खेळाडूला टाकले मागे

भारताची युवा स्टार फलंदाज शफाली वर्मा (Shafali Verma) ICC महिला T20 क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला मागे टाकून तिने हे स्थान पुन्हा मिळवले.
Shafali Verma
Shafali VermaDainik Gomantak

भारताची युवा स्टार फलंदाज शफाली वर्मा ICC महिला T20 क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला मागे टाकून तिने हे स्थान पुन्हा मिळवले. शेफाली वर्मा (Shafali Verma) याआधीही नंबर वन टी-20 फलंदाज आहे. मात्र स्मृती मधांनाची (Smriti Mandhana) क्रमवारीत घसरण झाली आहे. ती क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी आता दुसऱ्या तर मेग लेनिंग तिसऱ्या क्रमांकाची टी-20 फलंदाज आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची अ‍ॅलिसा हिली सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे (New Zealand) दोन खेळाडू पहिल्या दहामध्ये आहेत. सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्स अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. (Shafali Verma Has Become The Number One Batsman In The ICC Womens T20 Rankings)

दरम्यान, श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूने कॉमनवेल्थ गेम्स क्वालिफायरमध्ये 55.25 च्या सरासरीने 221 धावा आणि 185.71 च्या स्ट्राइक रेटने सहा स्थानांनी प्रगती करुन आठव्या क्रमांकावर पोहोचली आहे. इंग्लंडचा डॅनी व्याट तीन स्थानांनी पुढे 13व्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने 70 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅकग्राने 29 स्थानांची झेप घेत 28 व्या स्थानावर आहे. तिने अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध 49 चेंडूत नाबाद 91 धावांची खेळी केली कारण ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Shafali Verma
'गांगुली-द्रविडनेही विश्वचषक जिंकला नाही... कोहलीच्या बचावात उतरले शास्त्री मास्तर !

गोलंदाजीत टॉप-3 मध्ये कोणताही बदल नाही

गोलंदाजी क्रमवारीत अव्वल तीन खेळाडूंमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सारा ग्लेननंतर इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माईल तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या दीप्ती शर्माने चौथ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुटला मागे टाकत एका स्थानाचा फायदा मिळवला आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीप्ती तिसरी आली

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही फारसा बदल झालेला नाही. सोफी डिव्हाईन आणि नताली सायव्हर यांनी पहिले दोन स्थान कायम राखले आहे. दीप्ती शर्माने एका स्थानाने प्रगती करत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचली आहे. पाकिस्तानची निदा दार आणि थायलंडची नटाया बौचेथम यांनीही दोन स्थानांनी प्रगती करत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी चार स्थानांनी घसरुन पहिल्या दहामधून बाहेर पडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com