Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: सूर्या पुन्हा घेणार गगनभरारी, पहिल्या वनडेत एन्ट्री पक्की!

Suryakumar Yadav: मुंबईत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाबाहेर असणाऱ्या या खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

Manish Jadhav

Suryakumar Yadav May Replace Shreyas Iyer: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. यानंतर आता टीम इंडियाची नजर ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे असेल.

संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. संघाबाहेर असताना एका फलंदाजासाठी आनंदाची बातमी आली आहे.

मुंबईत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाबाहेर असणाऱ्या या खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

या फलंदाजाचा संघात समावेश होणार!

भारताचा T20 क्रिकेटचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघात संधी मिळू शकते.

मात्र, वनडे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली झालेली नाही. सूर्यकुमारने भारताकडून 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त 433 धावा आल्या आहेत, तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या 64 धावा आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते.

त्यामुळेच त्याला संघात संधी मिळेल!

सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आल्याची चर्चा आहे, कारण मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे सूर्यकुमारचे घरचे मैदान आहे.

या मैदानावर फलंदाजी करताना त्याने उत्कृष्ट विक्रम केले आहेत. सूर्या आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळतो. त्याने एकट्याने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे.

मात्र, टी-20 क्रिकेटमध्ये जगावर राज्य करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा फॉर्म अद्याप वनडेमध्ये पाहायला मिळालेला नाही.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संघाचा तणाव वाढला होता

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.

जवळपास दोन पूर्ण दिवस मैदानावर घालवल्यानंतर, अहमदाबाद कसोटीदरम्यान अय्यरने पाठदुखीसंबंधी तक्रार केली. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी आला नाही.

ईएसपीएन क्रिकइन्फो मधील अहवालात असे म्हटले आहे की, सध्या तो बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT