Suryakumar Yadav T20 Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: "जरा दडपण जाणवले पण.."! धडाकेबाज इनिंगनंतर कॅप्टन सूर्याचे मोठे वक्तव्य; फलंदाजांबाबत म्हणाला की..

Suryakumar Yadav T20: नवीन वर्षात नागपूरला ताज्या मनाने गेलो आणि तिथेच फरक पडला, असे मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सलामीच्या लढतीत केलेल्या महत्त्वाच्या खेळीनंतर सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

मुंबई: या स्पर्धे अगोदर गेल्या वर्षी माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. सरावात मी चांगली फलंदाजी करत होतो, पण सामन्यात गडबड होत होती. मग मी दोन आठवडे क्रिकेटपासून दूर गेलो. कुटुंबाबरोबर वेळ घालवला आणि नवीन वर्षात नागपूरला ताज्या मनाने गेलो आणि तिथेच फरक पडला, असे मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सलामीच्या लढतीत केलेल्या महत्त्वाच्या खेळीनंतर सांगितले.

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत शनिवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघ संकटात असताना सूर्यकुमारने ४९ चेंडूंत नाबाद ८४ धावांची खेळी केली. वानखेडेची खेळपट्टी १९० धावसंख्येची नाहीये. १४० - १५० ची आहे.

मला अनुभव आहे मुंबईच्या मातीचा खेळपट्टीचा आणि वातावरणाचा आणि त्याचा फायदा झाला. मला शेवटपर्यंत उभे राहायचे होते तेच मी केले. मी माझे फटके मारले, पण त्याकरिता वाट बघितली, असे सूर्यकुमार म्हणाला.

सहा बाद ७७ धावसंख्येवर दडपण जाणवले, पण विश्वास होता की शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबलो, तर आपण या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. जरा गडबड अशी झाली की सूर्य नेहमीच्या तेजीत बाहेर आला नव्हता. त्याने खेळपट्टीचा स्वभाव थोडा बदलला.

तरीही मान्य करावे लागेल की जरा फलंदाजी अजून नीट करायला पाहिजे होती. पुढच्या सामन्यासाठी थोडा वेळ हाती आहे. त्यात झालेल्या चुका सुधारून आम्ही जोमाने परत येऊ, असेही तो म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT