Bhuvneshwar Kumar Dainik Gomantak
क्रीडा

Bhuvneshwar Kumar Record: भुवीचा विकेट्सचा पंजा! 'हा' कारनामा करणारा IPL इतिहासातील केवळ दुसराच भारतीय

Pranali Kodre

GT vs SRH Bhuvneshwar Kumar Record: सोमवारी गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 62 व्या सामन्यात 34 धावांनी पराभूत केले. यासह गुजरातने प्लेऑफमधील स्थानही निश्चित केले.

पण असे असले तरी हैदराबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली.

या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 30 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याने वृद्धिमान साहा (0), शुभमन गिल (101), हार्दिक पंड्या (8), राशीद खान (0) आणि मोहम्मद शमी (0) यांना बाद केले. याशिवाय त्याने नूर अहमदला धावबादही केले.

तसेच नंतर गुजरातने दिलेल्या 189 धावांच्याआव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने 26 चेंडूत 27 धावांची खेळी केली. त्याने हेन्रिक क्लासेनबरोबर 8 व्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारीही केली.

  • जडेजाच्या पंक्तीत स्थान

त्यामुळे भुवनेश्वर कुमार एकाच आयपीएल सामन्यात 25 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा आणि 5 विकेट्स घेणारा दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा केवळ रविंद्र जडेजाने केला आहे.

जडेजाने 2012 आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध विशाखापट्टणमला खेळताना चेन्नई सुपर किंग्सकडून फलंदाजी करताना 48 धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना 16 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

  • दुसऱ्यांदा पाच विकेट्स

भुवनेश्वर कुमारची आयपीएलमध्ये पाच विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने 2017 आयपीएल हंगामात हैदराबादमध्ये खेळताना पंजाब किंग्सविरुद्ध 19 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे भुवनेश्वर आयपीएलमध्ये दोन वेळा 5 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय, तर एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी भारताच्या जयदेव उनाडकट आणि ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरने आयपीएलमध्ये दोन वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

गुजरातचा विजय

दरम्यान, सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात गुजरातने शुभमन गिलच्या 101 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या.

त्यानंतर 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 9 बाद 154 धावा करता आल्या. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT